वरोरा तालुक्यात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:48 PM2018-09-14T22:48:25+5:302018-09-14T22:48:44+5:30
मागील दोन दिवसांपासून वरोरा तालुक्यातील अनेक गावानजीक पट्टेदार वाघाने ग्रामस्थांना दर्शन दिले असून वरोरा शहरानजीकच्या खैरगावात गावा नजीकच्या गोठ्यात एक जनावर तर दोन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील दोन दिवसांपासून वरोरा तालुक्यातील अनेक गावानजीक पट्टेदार वाघाने ग्रामस्थांना दर्शन दिले असून वरोरा शहरानजीकच्या खैरगावात गावा नजीकच्या गोठ्यात एक जनावर तर दोन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वरोरा येथून नजीक चिमूर मार्गालगतच्या खैरगावमध्ये महादेव वाघ यांच्या शेतातील गोठ्यात जनावरे बांधून होती. या जनावरांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून एक जनावर जागीच ठार तर दोन गंभीररित्या जखमी झाले. अमोल वाघ यांची जनावरे गंभीर जखमी होवून तडफत होती तर एक मरण पावले होते. परिसरात वाघ दिसल्याने आरडाओरड केली त्यानंतर ग्रामस्थ गोळा होताच वाघ नाल्याकडे निघून गेला. दोन दिवसापूर्वी याच वाघाने नजीकच्या जामगाव येथील जनावरे ठार केल्याची घटना घडली होती. ज्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. पगमार्कवरुन हा पट्टेदार वाघ असल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.
वाघाचे भद्रावती कनेक्शन
वरोरा तालुक्यात वावरत असलेला वाघ हा काही दिवसांपूर्वी भद्रावती शहरानजीक वास्तव्यास होता. तोच वाघ वरोरा तालुक्यात फिरत असल्याचे मानले जात आहे.
पाळीव जनावरे ठार झाली. तिथल्या पगमार्कवरून वाघ असल्याचे दिसून येते. परिसरात गस्त वाढविली असून वाघाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावणे सुरू आहे.
- के.आर. आक्केवार
वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा