आदिवासींच्या मागण्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी पुढाकार घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:22 PM2017-12-26T23:22:31+5:302017-12-26T23:23:11+5:30
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. ही बाब न विसरता समाजाचे संघटन करून प्रत्येक समाजाने आपला विकास घडवून आणावा.
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. ही बाब न विसरता समाजाचे संघटन करून प्रत्येक समाजाने आपला विकास घडवून आणावा. आपण आपल्या सामाजिक समस्येकडे बोट दाखवा. हे सरकार तुमचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या भाषणातून दिला.
येथील शिंदे मंगल कार्यालयात सोमवारी गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, भद्रावतीतर्फे संपूर्ण आदिवासी वीर-विरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. सोहळ्याचे उद्घाटन माजी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, नगरसेवक प्रमोद गेडाम, पंजाबराव मडावी, रमेश मेश्राम, रंजना उईके, विरेंद्र आत्राम, कांचन वरठी, मनोज आत्राम, भूपती मेश्राम, डॉ. मडावी, प्रमोद नागोसे, अजय लिहितकर, विशाल बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक भद्रानाग मंदिरापासून पेट्रोलपंप चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या रॅलीत जवळपास दहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले होते. सदर रॅलीत विविध आदिवासी नृत्य करण्यात आले.
रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर व रमेश मेश्राम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मेळाव्यात आदिवासी समाजातील महापुरुषांना मानवंदना देण्यात आली. प्रास्ताविक अशोक तुमराम यांनी केले. संचालन प्रा. अविनाश यांनी तर आभार गितेश कुळमेथे यांनी मानले.