पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी नेत्यांकडून इच्छुकांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:00 AM2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:00:31+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने तडजोडी करताना नेत्यांची दमछाक होत आहे. सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती नगर पंचायतीत एकाच प्रभागात आणि एकाच पक्षातील अनेकांनी उमेदवारी मागितल्याने तालुकास्तरावरील नेत्यांची दमछाक सुरू झाली आहे.

Leaders' willingness to avoid factionalism within the party | पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी नेत्यांकडून इच्छुकांची मनधरणी

पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी नेत्यांकडून इच्छुकांची मनधरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती नगर पंचायतीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार आहे. दि. ७ डिसेंबरला नामनिर्देशन दाखल करण्याचा अंतिम दिवस असला, तरी कोरपना वगळता अजूनही पाच नगर पंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुकांची मनधरणी सुरू झाली आहे. तडजोडी झाल्या तर सोमवारी नामनिर्देशनासाठी गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने तडजोडी करताना नेत्यांची दमछाक होत आहे. सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती नगर पंचायतीत एकाच प्रभागात आणि एकाच पक्षातील अनेकांनी उमेदवारी मागितल्याने तालुकास्तरावरील नेत्यांची दमछाक सुरू झाली आहे. उमेदवारी देताना वरिष्ठ नेत्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने दररोज बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक आधीपासूनच तयारीला लागले होते. मात्र, प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होताच अनेकांचा अपेक्षाभंग झाला. असे इच्छुक उमेदवार आता नवीन प्रभागातून उमेदवारी मिळावी यासाठी शक्ती पणाला लावत आहेत.

नामांकनासाठी दोन दिवस शिल्लक 
- ७ डिसेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. 
- छाननी ८ डिसेंबरला होईल तर १३ डिसेंबरला माघार घेता येईल. तसेच आक्षेप असल्यास  उमेदवारांना १६ डिसेंबरला अपील सादर      करता येणार आहे. 
- १६ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप व उमेदवारी मागे घेतल्यानंतर २१ डिसेंबरला मतदान होणार आहे.   

एकाच प्रभागात अनेकांचा दावा
- सहापैकी केवळ कोरपना नगर पंचायतीत २० जणांनी नामनिर्देशन दाखल केले. यासाठी अंतिम तारीख ८ डिसेंबर असली, तरी प्रभागातील एकाच जागेवर अनेकांनी दावा केल्याने उमेदवारी द्यायची कुणाला, या प्रश्नाने नेते पेचात सापडले आहेत. 
- स्थानिक नेते आता जिल्हास्तरीय नेत्यांशी सल्लामसलतीसाठी धावपळ करत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतीतही पोटनिवडणुकीची रणधुमाळी
पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. 
७ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी आणि ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात येईल. 
निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होईल. तसेच आवश्यक असल्यास २१ डिसेंबर रोजी मतदान होईल आणि २२ डिसेंबर रोजी मतमोजणी  होईल.

 

Web Title: Leaders' willingness to avoid factionalism within the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.