महिला बचत गटाची दिल्लीत झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:37 PM2018-02-25T23:37:28+5:302018-02-25T23:37:28+5:30
राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत उत्कृष्ठ कार्य करणाºया महिला बचत गटांचा देशपातळीवर सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य शासनाने २० प्रस्तावांची केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे.
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत उत्कृष्ठ कार्य करणाºया महिला बचत गटांचा देशपातळीवर सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य शासनाने २० प्रस्तावांची केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे. त्यात विदर्भातील तीन प्रस्ताव असून यामध्ये भद्रावती न.प. अंतर्गत उन्नती महिला बचत गटाची निवड करण्यात आली आहे.
एरिया लेव्हल फेडरेशन (वस्तीस्तर संघ) हा महिला बचत गट आहे. भद्रावती न.प.अंतर्गत असे पाच गट नोंदणीकृत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात एएलएफ संस्था असलेले भद्रावती पालिका एकमेव आहे.
स्वच्छता अभियानात उत्कृष्ठ कार्य करणाºया महिला बचत गटांचे प्रस्ताव केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला मागविले होते. त्यात पाचही एएलएफचे प्रस्ताव न.प. भद्रावतीकडून पाठविण्यात आले. राज्य शासनाने याबाबत तपासणी केली. यात उन्नती महिला बचत गट, आंबेडकर वार्ड, भद्रावती या महिला बचत गटाचे कार्य पाहून राज्यस्तरावर निवड करून प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे.
नुकतीच केंद्राची चमू भद्रावतीत येवून संबंधित वॉर्डाची, प्रभागाची, शौचालयाची, कार्यालयाची तपासणी केली. राबविलेले उपक्रम, सहभाग, महिला सक्षमीकरण, जागृती, स्वच्छता, ओला-सुका कचºयाबाबत जनजागृतीबाबत तपासणी करण्यात आली. चमूने अंतिम प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून निवड झालेल्या बचत गटाचा सत्कार दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते केला जाणार आहे.