लर्निंग लायसन्स बातमीतील बॉक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:40+5:302021-07-03T04:18:40+5:30
ऑनलाइनसाठी काय अडचणी ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने अर्ज सबमिट होण्यास अडचण येते. बऱ्याचदा ओटीपी येत नाही. कागदपत्र सबमिट ...
ऑनलाइनसाठी काय अडचणी
ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने अर्ज सबमिट होण्यास अडचण येते. बऱ्याचदा ओटीपी येत नाही. कागदपत्र सबमिट करताना अडचण येते. बऱ्याचदा सर्व्हरमध्ये बिघाड अशा तांत्रिक अडचणी दाखविण्यात येतात. कोरोनामुळे निर्बंध असल्याने विशिष्ट वेळेतच नेट कॅफे सुरू राहत असल्याने अर्ज करण्यास अडचण येत आहे.
बॉक्स
उमेदवार वेगळा, ऑनलाइन परीक्षा देणारा दुसराच
ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढताना परीक्षादेखील ऑनलाइन द्यावी लागते. मात्र ही परीक्षा देताना उमेदवार वेगळा व परीक्षा देणारी व्यक्ती दुसरीच असे प्रकार बहुतेक ठिकाणी आढळून आले. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी एक पथक तयार केले असून, नेट कॅफेची तपासणी करीत आहेत. यातील दोषींचा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येत आहे.
बॉक्स
४६६ जणांना लर्निंग लायसन्स
चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून ऑनलाइन लायसन्स देण्यास सुरुवात केल्यानंतर आजपर्यंत ८१५ जणांनी अर्ज केले. यापैकी ४६६ जणांना लायसन्स देण्यात आले. उर्वरित अर्ज कागदपत्र न जोडणे, अर्जात त्रुटी अशा कारणांवरून रद्द करण्यात आले आहेत.
------
कोट
ऑनलाइनसह ऑफलाइन लायसन्स काढण्याची प्रक्रिया आरटीओ कार्यालयात सुरू आहे. ऑनलाइन लायसन्स काढण्यासाठी केवळ ३० टक्के लोकांचा कल दिसून येत आहे. तर उर्वरित ७० टक्के वाहनधारक ऑफलाइन लायसन्स काढत आहेत. कोरोनामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी लायसन्स निघाली आहेत. अर्जदारांना लवकरात लवकर व सहजरीत्या लायसन्स उपलब्ध व्हावे, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.
किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर