गोंडपिपरीतील गावठाण अतिक्रमणधारकांना पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:24 PM2019-04-26T22:24:48+5:302019-04-26T22:25:40+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वढोली : प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे गावठाण अतिक्रमणधारकांना पट्टे द्यावी, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सपना साकलवार यांच्या नेतृत्वाती शिष्टमंडळानी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सन १९६६-६७ या वर्षात तहसील कार्यालय गोंडपिपरीनजिक असलेल्या आबादीत जागेवर साधारणत: ६० पेक्षा अधिक कुटुंबियांनी निवाºयासाठी अतिक्रमण करून घरे बांधली होती. त्याला आता ५२ वर्षांचा काळ लोटला आहे. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने शासन प्रशासनाकडे स्थायी पट्टे देण्याची मागणी होती. या मागणीची दखल घेत महसूल व वन विभाग मंत्रालयातील कक्ष अधिकाºयांनी २० जुलै १९९६ च्या निर्णयानुसार राम मंदिर गावठाण जागेजवळील अतिक्रमणाचे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश चंद्रपूर जिल्हाधिकाºयांना दिले होते. तत्कालिन जिल्हाधिकाºयांनी ११ मे १९९९ मध्ये गोंडपिपरीच्या तहसीलदारांना आदेश दिले होते. परंतु, ५२ वर्ष उलटूनही अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात आले नाही. राम मंदिर गावठाण जागेवरील अतिक्रमणधारकांकडून दंडाची रक्कमही वसूल करण्यात आली. नगरपंचायती तील गाव नमूना आठमध्ये नोंदही करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर झाल. मात्र जागेसंबंधी कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी प्रवीण नरहरशेट्टीवार, ताराबाई वायकोर, बंडू पुडके, मोरेश्वर गेडाम, परमानंद पल्हाडे, किसन चौधरी, वनिता लटारे, सिताराम वेलादी, विनोद फलके उपस्थित होते.