मूल येथील बेघर वस्तीत राहणाऱ्यांंना पट्टे देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:42+5:302021-09-27T04:30:42+5:30
चंद्रपूर : मागील भाजप सरकारच्या काळात मूल येथील झोपडपट्टीधारकांंना घराचे पट्टे देण्याचे आश्वासन तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र कार्यकाळ ...
चंद्रपूर : मागील भाजप सरकारच्या काळात मूल येथील झोपडपट्टीधारकांंना घराचे पट्टे देण्याचे आश्वासन तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र कार्यकाळ पूर्ण होऊनही कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे बेघर वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या प्लॉटची निशुल्क मोजणी करून सर्वांना प्लॉटची नि:शुल्क मोजणी करून सर्वांना पट्टे देण्यात येईल, असे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी झोपडपट्टीधारकांना दिले.
मूल येथील झोपडपट्टीधारक काँग्रेसचे नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांंना भेटून राहायला घर नाही, मालकीची जागा नाही, अशी आपली व्यथा मांडली. त्यामुळे त्यांना खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेऊन मूलवासीयांची समस्या निकाली काढण्याबाबत विनंती केली. खासदार धानोरकर यांनी बँकेचे अध्यक्ष रावत, काँग्रेस नगरसेवक व कार्यकर्त्यांना सोबत झोपडपट्टीवासीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर बेघर वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या प्लॉटची नि:शुल्क मोजणी करून सर्वांना पट्टे देण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव विनोद दत्तात्रय, बन्सलसिंग, साहिल शेख, माजी सभापती वैशाली पुल्लावार, माजी जि. प. सदस्य मंगला आत्राम, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, उपसभापती संदीप कारमवार, संचालक अखिल गांगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार, शांताराम कामडे, डाॅ. पद्माकर लेनगुरे, अन्वर शेख, किशोरा धुडसे, शेतकरी काँग्रेसचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, विवेक मृत्यालवार, राजू वाढई, कृष्णा सूरतवार, चंद्रकांत चतारे आदी उपस्थित होते.