दक्षिण मध्य रेल्वेगाड्या बल्लारशाहपर्यंत सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:31 AM2021-08-28T04:31:53+5:302021-08-28T04:31:53+5:30

सुदर्शन निमकर यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी सास्ती : कोरोना महामारी रोगामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काही गाड्या फक्त ...

Leave South Central Railway to Ballarshah | दक्षिण मध्य रेल्वेगाड्या बल्लारशाहपर्यंत सोडा

दक्षिण मध्य रेल्वेगाड्या बल्लारशाहपर्यंत सोडा

Next

सुदर्शन निमकर यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी

सास्ती : कोरोना महामारी रोगामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काही गाड्या फक्त तेलंगणा राज्याच्या सिरपूर - कागजनगर आणि सिरपूर टाऊनपर्यंत सुरू केल्या आहेत. त्या कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्यात आणल्या जात नाहीत. त्या गाड्या दक्षिण मध्य रेल्वेच्या शेवटचे स्टेशन बल्लारशाहपर्यंत आणण्याची मागणी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेची मर्यादा महाराष्ट्राच्या बल्लारशाह स्टेशनपर्यंत आहे. परंतु लॉकडाऊन काळात बल्लारशाहकडे येणाऱ्या गाड्या बंद केल्यामुळे महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि जिल्हा मुख्यालय, चंद्रपूर परिसरातील प्रवाशांना अडचणी येत आहेत आणि हा महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. तेलंगणातील कागजनगर आणि महाराष्ट्राचा बल्लारशाह दरम्यानचा भाग हा सीमाभाग आहे. या परिसरात बहुतांश तेलगू भाषिक नागरिक राहात असून, या भागाचा मोठ्या प्रमाणात तेलंगणातील राज्यातील गावांशी जनसंपर्क असल्यामुळे दैनंदिन रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. सीमा भागातील लोकांना सुविधा देण्यासाठी रेल्वेगाड्या सिकंदराबाद आणि काझीपेठ ते सिरपूर - कागजनगर ते बल्लारशाहपर्यंत वाढवल्या पाहिजेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे गाड्या बल्लारशाहपर्यंत पुन्हा सुरू कराव्यात आणि सिरपूर - कागजनगरपर्यंत चालणाऱ्या गाड्या बल्लारशाहपर्यंत वाढवाव्यात. याच बरोबर नागपूरहून सिकंदराबादकडे जाणारी इंटरसिटी एक्स्प्रेस माणिकगड रेल्वे स्टेशन आणि विरूर स्टेशनवर थांबत होती. परंतु ही ट्रेन रायपूर ते सिकंदराबादपर्यंत धावत असल्याने माणिकगड स्टेशन आणि विरूर स्टेशनचा थांबा बंद करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत असून, या रेल्वेगाडीचे थांबे देण्यासाठी नागरिक मागणी करीत आहेत. नागरिकांची ही मागणी लक्षात घेता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्या बल्लारपूरपर्यंत सोडण्याच्या मागणीचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाठविले आहे.

270821\1456-img-20210826-wa0016.jpg

संग्रहित छायाचित्र

Web Title: Leave South Central Railway to Ballarshah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.