जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:00 PM2017-08-24T22:00:29+5:302017-08-24T22:00:51+5:30
येथील जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरच्या वतीने ‘प्ली बार्गेनिंग, बंद्यांचे अधिकार तसेच बेल प्रोव्हिजन’ या विषयावर गुरूवारी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरच्या वतीने ‘प्ली बार्गेनिंग, बंद्यांचे अधिकार तसेच बेल प्रोव्हिजन’ या विषयावर गुरूवारी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव बलवाणी होते. तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून अॅड. एस. आर. धागमवार व अॅड. चिन्मय भागवत तर कारागृहाच्या वतीने कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारागृहाच्या वतीने अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी ‘प्ली बार्गेनिंग, बंदीवानांचे अधिकार तसेच बेल प्रोव्हिजन’ या विषयावर माहिती दिली. कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन ढोले यांनीही यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रभारी सचिव बलवाणी यांनी कारागृहातील न्या. बंदी नाजीम, अन्सार बेग, प्रशांत दुर्गे, शिवराज चव्हान, धनराज वैद्य, संतोष चव्हान, कौस्तुभ कुलकर्णी यांच्या कायदेविषयक समस्या जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. तसेच गरीब कैद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत वकील मिळवण्यासाठी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले तर आभार तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनिल वानखडे, तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे, सुभेदार नारायण उमरेडकर, रक्षक रवी पवार, लोकचंद नंदनवार आदी कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.