विधिमंडळ समितीने केली तालुक्यात रोहयो कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:35+5:302021-09-05T04:31:35+5:30

समिती प्रमुख आमदार मनोहर चांद्रिकापुरे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार राजेश पाटील आणि आमदार अमोल मिटकरी या समितीत होते. ...

Legislative Committee inspects Rohyo work in Kelly taluka | विधिमंडळ समितीने केली तालुक्यात रोहयो कामाची पाहणी

विधिमंडळ समितीने केली तालुक्यात रोहयो कामाची पाहणी

Next

समिती प्रमुख आमदार मनोहर चांद्रिकापुरे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार राजेश पाटील आणि आमदार अमोल मिटकरी या समितीत होते. चंद्रपूर येथून निघालेली ही समिती नागभीड तालुक्यातील चिखलगाव मार्गे गिरगाव येथे पोहोचली. स्वागताची कोणतीही औपचारिकता न करता ही समिती सरळ गिरगाव येथील स्मशानभूमीत गेली आणि स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली. यानंतर अभिसरण निधीतून बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम या समितीने पाहिले. जवळपास पाऊण तास ही समिती गिरगावमध्ये होती. या वेळी सरपंच प्रशांत गायकवाड व उपसरपंच शरद सोनवणे उपस्थित होते.

यानंतर ही समिती मिंडाळा येथे आली. मिंडाळा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाची पाहणी या समितीने केली.

040921\img-20210903-wa0038.jpg

कामाची पाहणी करतांना समिती

Web Title: Legislative Committee inspects Rohyo work in Kelly taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.