ताडोबात बिबट व अस्वलाच्या मैत्रीची चर्चा, छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर व्हायरल

By राजेश भोजेकर | Published: April 21, 2023 01:39 PM2023-04-21T13:39:37+5:302023-04-21T13:44:59+5:30

कोलारा बफर झोनमध्ये बिबट व अस्वल एकमेकांच्या समोर उभे ठाकले

Leopard and bear standing face to face at tadoba tiger reserve, photo viral on 'social media' | ताडोबात बिबट व अस्वलाच्या मैत्रीची चर्चा, छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर व्हायरल

ताडोबात बिबट व अस्वलाच्या मैत्रीची चर्चा, छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर व्हायरल

googlenewsNext

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोलारा बफर झोनमध्ये बिबट व अस्वल एकमेकांच्या समोर उभे ठाकले असल्याचे छायाचित्र समाज माध्यमावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

९१ वाघ व यापेक्षा अधिक बिबट संख्या असलेल्या तसेच अस्वल संख्या ही अधिक आलेल्या ताडोबा प्रकल्पात देशी विदेशी पर्यटकांची गर्दी झाली आहे. उन्हाची तीव्रता बघता पर्यटकांची संख्या रोडावणार असा अंदाज व्यक्त केला जात असताना पर्यटकांनी हा अंदाज खोटा ठरविला आहे.

पर्यटक सकाळ व दुपार अशा दोन्ही वेळात सफरीचा आनंद घेत आहेत. अशातच ताडोबा बफर झोनमध्ये येणाऱ्या कोलारा परिसरात बिबट आणि अस्वल एकमेकांच्या समोर उभे राहून एकमेकांकडे बघत असल्याचे छायाचित्र एका पर्यटकाने टिपले आहे. हे छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे. विशेष म्हणजे या छायाचित्रात बिबट व अस्वल एकमेकांकडे मैत्री पूर्ण भावनेतून बघत आहेत. दोघांची देहबोली बरीच बोलकी आहे. या बोलक्या छायाचित्रणाची सर्वत्र चर्चा आहे.

Web Title: Leopard and bear standing face to face at tadoba tiger reserve, photo viral on 'social media'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.