धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:57+5:302021-08-22T04:30:57+5:30

विसापूर (चंद्रपूर) : कर्तव्य बजावून परत येत असलेल्या विश्वास गिरसावळे (३६) रा. विसापूर या पेपर मिल कामगाराच्या चालत्या बाईकवर ...

Leopard attack on a running bike | धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला

धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला

Next

विसापूर (चंद्रपूर) : कर्तव्य बजावून परत येत असलेल्या विश्वास गिरसावळे (३६) रा. विसापूर या पेपर मिल कामगाराच्या चालत्या बाईकवर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री १०.२५ वाजताच्या सुमारास पेपर मिल -विसापूर छोटा गेट,(धोबीनाला) जवळ घडली.

विश्वास हा नेहमी प्रमाणे ड्युटी करून परत येत असताना अचानक दडी मारून बसलेल्या बिबट्याने त्याच्या चालत्या दुचाकीवर हल्ला चढवून त्याला खाली पाडले. जवळच त्याच्या मागे असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तिथून पळून गेला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. या घटनेत त्याच्या हाताला बिबट्याची नखे रुतली व गाडीवरून पडल्याने त्याला चांगलाच मार बसला. त्याला रात्रीच चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तथा पेपर मिल सुरक्षा रक्षकांनी त्याची भेट घेतली व घटनेची सविस्तर माहिती घेतली. या घटनेच्या दहा मिनिटांपूर्वी सुरेश धोटे या कामगारावर सुद्धा बिबट्याने झडप घातली होती व त्यामध्ये तो थोडक्यात बचावला त्याच्या मागे विसापूर येथील रहिवासी महेश आस्वले आपल्या पत्नी व भाचीसह घरी परत येत असताना त्याच्या टू व्हीलर गाडीकडे तो जाऊ लागला होता; त्याने प्रसंगावधान साधून आपल्या गाडीचा हेडलाईटचा लख्ख प्रकाश बिबट्याच्या तोंडावर पाडला त्यामुळे तो बिबट घाबरून तिथून पळून गेला. सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

आजूबाजच्या परिसरात झुडपे वाढल्यामुळे हिंसक प्राण्यांचा वावर खूप वाढला आहे. यापूर्वी याच परिसरात दोन गाईंची सुद्धा शिकार झाली आहे. एका आठवड्यापूर्वी चुनाभट्टी परिसरात वाघाचे दर्शन सुद्धा झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पेपर मिल व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षेखातर आजूबाजूचे झाडेझुडपे तोडावे व विसापूर लगतचा रोडवर सुद्धा झाडेझुडपे वाढल्याने हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विसापूर ग्राम प्रशासनाने सुद्धा झाडेझुडपे तोडून रोड मोकळा करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

210821\img-20210820-wa0171.jpg

पेपरमिल कामगारावर बिबट्याचा हल्ला

Web Title: Leopard attack on a running bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.