विसापूर येथे बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:37+5:302021-03-04T04:52:37+5:30
विसापूर : विसापूर गावालगतच्या शिवारात सकाळी ५ वाजताच्या दरम्यान एक शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन झाले. रात्रीला हरभऱ्याचे जंगली डुकरापासून ...
विसापूर : विसापूर गावालगतच्या शिवारात सकाळी ५ वाजताच्या दरम्यान एक शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन झाले.
रात्रीला हरभऱ्याचे जंगली डुकरापासून संरक्षण करण्यासाठी जागलीला जाऊन परत येत असताना भुनकीजवळ बिबट्याचे दर्शन झाले. शेतकऱ्याने आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने शेतातून पळ काढला. ही बाब गावात माहीत होताच गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची एकेक करून जनावरे बेपत्ता होत आहेत. एक महिन्याच्या कालावधीत भिवसन परिसरात सुधाकर गिरडकर यांची एक गाय व वासरू वाघाने मारल्याची घटना घडली. प्लायवूड कंपनीजवळ रात्रीला रस्त्याने जात असलेल्या लोकांना वाघाचे दर्शन झाले. आत्ता तर गावालगतच्या भुनकीजवळच बिबट्याचे दर्शन झाले. शेतकऱ्यांची जनावरे चराईला गेल्यावर परत घरी न येण्याचा जणू घटनाक्रमच चालू झाला आहे. वनविभागाने सोडलेले वाघ आणि बिबटे जनावरे फस्त करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.