पाळीव जनावरे कमी, नाइलाजाने रासायनिक खतांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:08+5:302021-07-12T04:18:08+5:30

शेतजमिनीचा पोत घसरण्याची शक्यता : मजुरी वाढल्याने तणनाशकाचा पर्याय प्रकाश पाटील मासळ ( बु ) : शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांची ...

Less pet, use chemical fertilizers with nilaja | पाळीव जनावरे कमी, नाइलाजाने रासायनिक खतांचा वापर

पाळीव जनावरे कमी, नाइलाजाने रासायनिक खतांचा वापर

Next

शेतजमिनीचा पोत घसरण्याची शक्यता : मजुरी वाढल्याने तणनाशकाचा पर्याय

प्रकाश पाटील

मासळ ( बु ) : शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांची दिवसेंदिवस संख्या कमी होत असल्यामुळे शेतात शेणखत टाकायला मिळणे आता कठीण झाले आहे. तसेच मजुरांच्या वाढत्या मजुरीने नाइलाजास्तव शेतकऱ्यांना तणनाशक फवारणीचा वापर फार मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. वाढत्या तणनाशक फवारणीने शेतजमिनीचा पोत घसरत असला तरीसुद्धा याशिवाय सध्या शेतकऱ्यांकडे कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध दिसत नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी रासायनिक खतांसह तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

शेतकरी पूर्वी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, अशी पाळीव जनावरे पाळत होते. त्यातून मिळणारे शेणखत शेतीसाठी उपयोगी पडत होते. त्यामुळे शेणखतातून शेतीला फार मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वे मिळत होती. या तत्त्वामुळे शेतजमिनीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नव्हती. याशिवाय या घटकांमुळे शेतजमिनीचा पोतही वाढत होता. या सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही आंतरपिके शेतकऱ्यांना घेता येत होती. उत्पन्नाचा दर्जा चांगला राहत होता. त्यामुळे पौष्टिक अन्न मिळण्यास मदत होत होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे.

यापूर्वी खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तरी शेतकरी स्वत: उपाययोजना करीत होता. परंतु कालांतराने ही पद्धत मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र पाहायला मिळत नाही. पीक चांगले राहण्याकरिता शेतकरी दिवसेंदिवस रासायनिक खतांसह फवारणीकडे कल देत आहेत. त्यामुळे जमिनीतील आवश्यक पोषक तत्त्वे नष्ट होत आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांना शेणखत मिळेना!

परिसर बफर, कोर झोन लगत असल्याने व दिवसेंदिवस वाघांचे वाढते हल्ले तसेच गुरांचे चराई क्षेत्र कमी झाल्याने शेतकऱ्यांकडील गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या ही पाळीव जनावरे कमी प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांचा आता खरीप व रब्बीचा हंगाम अत्याधुनिक ट्रॅक्टरच्या यंत्राचा वापर करून जमिनीची मशागत करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात शेणखत टाकायला मिळेनासे झाले आहे.

110721\img-20210711-wa0147.jpg

शेतकरी शेतात रासायनिक तणनासकांची फवारणी करतांना

Web Title: Less pet, use chemical fertilizers with nilaja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.