बसेसच्या फेऱ्या कमी, महामंडळाला आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:05+5:302020-12-17T04:52:05+5:30

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यांनतर महामंडळाने मालवाहतूक सुरु केली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात महामंडळाला ...

Less rounds of buses, a financial blow to the corporation | बसेसच्या फेऱ्या कमी, महामंडळाला आर्थिक फटका

बसेसच्या फेऱ्या कमी, महामंडळाला आर्थिक फटका

Next

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यांनतर महामंडळाने मालवाहतूक सुरु केली. मात्र पाहीजे त्या प्रमाणात महामंडळाला उभारी मिळाली नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी ५० टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या. परंतु, त्याला प्रवाशांनी पाठ दाखवली. आता बसफेऱ्या नियमीत धावत आहेत. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसफेरी धावत नाही. तसेच रात्रकालीन बसफेऱ्यामध्ये बदलाव करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता बसफेऱ्या धावत नाही.

पूर्वी चारही आगारातून दीड हजारच्या सुमारास बसफेऱ्या धावायचा. आता ११०० च्या जवळपास बसफेऱ्या धावत आहेत. त्यातहुी पूर्वीप्रमाणे प्रवासी मिळत नाही. त्यामुळे त्यामुळे महामंडळाला दररोज सुमारे पाच लाखांचा फटका बसत आहे. त्यामुळे पूर्वीच आर्थिक तोट्यात असलेले महामंडळ पुन्हा तोट्यात जात आहे.

काही बस मालवाहतूकसाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे आता २३० बस धावत आहेत. ग्रामीण भागातही मागणीनुसार बसेफेऱ्या पोहचल्या आहेत. पूर्वी विभागाचे उत्पन्न सुमारे ३० लाखांच्या जवळपास असायचे आता २० लाखांच्या जवळपास उत्पन्न होत आहे.

- आर. एन. पाटील,

विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

जिल्ह्याचे उत्पन्न घटले

चंद्रपूर जिल्ह्यात पूर्वी १५०० च्या जवळपास बसफेऱ्या ९० हजार किमी धावायचा. त्यातून मंडळाला २५ ते ३० लाखांपर्यंत उत्पन्न मिळायचे. कोरोनानंतर ११०० बसफेऱ्या ७७ हजार किमी धावत आहेत. त्यातून केवळ २० लाख उत्पन्न मिळत आहे.

Web Title: Less rounds of buses, a financial blow to the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.