विद्यार्थ्यांना दिले विधी सेवेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:44 PM2017-11-20T23:44:16+5:302017-11-20T23:44:54+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने एक दिवसीय विधी कार्यशाळा पार पडली.
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने एक दिवसीय विधी कार्यशाळा पार पडली.
अध्यक्षस्थानी न्यायाधीश तथा अध्यक्षा तालुका विधी सेवा समितीच्या रुपाली सी. नरवाडीया प्रमुख अतिथी म्हणून सह न्यायाधीश अ. आ. ढोके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अझीझूल हक, अॅड. डी. व्ही. अलगदेवे, अॅड. डी. एस. माटे, अॅड. हेमंत उरकुडे, अॅड. सी. पी. गोहणे, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. मनोहर उरकुडे, अॅड. अंडलेकर, प्राचार्य दुर्गे, अॅड. तलमले, अॅड. टेंभुर्णे, अॅड. सावकर, जी. एस. राऊत सरकारी वकील, अॅड. व्ही. बी. नाकतोडे, अॅड. गिरडकर आदी वक्ते उपस्थित होते.
कायद्याचे ज्ञान सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्टÑीय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. न्या. रुपाली नरवाडीया यांनी कायद्याच्या विविध पैलूंची सोप्या भाषेत मांडणी केली. अॅन्टी रॅगींग, सायबर क्राईम, राईट्स आॅफ चिल्ड्रन, चाईल्ड फ्रेंडली आणि कायद्यातील शिक्षाविषयक अधिकारावर या कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन केले. न्यायमूर्ती ढोके यांनी संवैधानिक जबाबदारीवर प्रकाश टाकला. अॅड. अलगदेवी यांनी चाईल्ड फ्रेंडलीच्या वातावरणातून समाज जागृती कशी करायची, यावर विचार मांडले. अॅड, गोहणे यांनी रॉइट्स आॅफ चिल्ड्रन या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्राचार्य अझीझूल हक, संचालन अॅड. अंडेलकर, प्रा. माला खोब्रागडे यांनी केले. प्रा. सरोज सिंगाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तालुका विधी समितीचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.