पोलिसांच्या आदेशाकडे घरमालकांची पाठ
By admin | Published: July 19, 2015 01:08 AM2015-07-19T01:08:38+5:302015-07-19T01:08:38+5:30
असामाजिक घटनांवर आळा घालण्यासाठी भाडेकरूंबाबत माहिती देण्याचे आवाहन करूनही ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या घरमालकांना आता पोलिसांनी थेट नोटीसच बजावल्या आहे.
अनेकांना नोटीस : भाडेकरूंबाबत माहिती देण्यास टाळाटाळ
चंद्रपूर : असामाजिक घटनांवर आळा घालण्यासाठी भाडेकरूंबाबत माहिती देण्याचे आवाहन करूनही ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या घरमालकांना आता पोलिसांनी थेट नोटीसच बजावल्या आहे. या उपरांतही घरमालक माहिती देण्याबाबत उदासिन आहे. भविष्यात कुण्या भाडेकरूकडून एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास घरमालकदेखील कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.
स्वत:ची बनावट नावे सांगून किरायाने घर मिळविल्यानंतर त्या घरातूनच अनेक असामाजिक गुन्हे घडल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. घरमालकांची दिशाभूल करून गुन्हेगार घर मिळवितात व नंतर गुन्हे करून पळून जातात. मात्र पुढे पोलिसांनादेखील त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. यातून गुन्हेगार पोलिसांपासून दूर राहण्यात यशस्वी होतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक घरात किरायाने राहणाऱ्या भाडेकरूची संपूर्ण माहिती गोळा करण्याची मोहिम पोलिसांनी सुरू केली होती. सुरूवातीला पोलीस यंत्रणेने नागरिकांना तसे आवाहनदेखील केले होते. मात्र नागरिकांनी प्रतिसादच दिला नाही. (प्रतिनिधी)
नागरिकांची उदा२’नता गंभीर बाब
आवाहन करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५० पेक्षा अधिक घरमालकांना शहर पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. विशेष म्हणजे दोनवेळा नोटीस दिल्यानंतर एकही घरमालक माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरीदेखील चढला नाही. यावरून नागरिक स्वत:च किती उदासिन आहेत, हे दिसून येते. पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर त्याला प्रतिसाद न देणे हा कायदेशिर गुन्हा असला तरी ही बाब गंभिर्याने घेतली नाही.
यापूर्वी घडल्या आहेत घटना
एखाद्या ठिकाणी स्वत:चे बनावट नाव सांगून घर किरायाने घेतले. पुढे गंभीर गुन्हा करून तो फरार झाला, अशा घटना यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत.