बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीक कर्जाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:56 PM2018-09-29T21:56:16+5:302018-09-29T21:57:11+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती.

Lessons to the non-loan farmers' crop loans | बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीक कर्जाकडे पाठ

बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीक कर्जाकडे पाठ

Next
ठळक मुद्देतुटपुंज्या मदतीचा परिणाम : स्वेच्छेने तीन हजार शेतकऱ्यांनीच काढला विमा

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा बहुसंख्य शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, याकरिता जिल्हा प्र्रशासनाने प्रचार मोहीम राबविली होती. मात्र गतवर्षीच्या विमा कंपनीकडून मिळालेल्या तुटपुंजा मदतीच्या अनुभव पुढे असल्याने यंदाच्या खरिप हंगामात केवळ कर्जदार शेतकऱ्यांनीच विमा काढला तर हजारो बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली.
खरिप २०१८ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कर्जदार, बिगर कर्जदार व भाडीपट्टवरील शेतकरी विम्याचा लाभ घेऊ शकतात. चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उबंरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदल्यास अथवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान व काढणी पश्चात नुकसान तसेच नैसर्गिक आपत्तीपासून नुुकसान टाळण्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते, असा दावा सरकार व विमा कंपन्यांनी केला. जिल्ह्यातील अधिसुचित पिकांसाठी हा विमा लागू आहे. विमा संरक्षित रक्कमेच्या दोन टक्के, नगदी व व्यापारी पिकांसाठी पाच टक्के या दराने विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. संबंधित विमा कंपनीकडे २४ जुलै २०१८ प्रस्ताव सादर करावे, असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कळविण्यात आले होते. जिल्ह्यासाठी आयसीआयीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या कंपनीने व्यापक स्वरूपात जागृती केली नाही. परिणामी, बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमाकडे पाठ फिरवली, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
५६ हजार हेक्टर क्षेत्राचे संरक्षण
कर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून ५६ हजार ४७३ हेक्टर क्षेत्रावरील खरिप पिकाच्या संरक्षणाची हमी मिळाली. संबंधित कंपनीने योग्य माहिती संकलित करून विमाधारक शेतकऱ्यांना सरकारशी केलेल्या करारानुसार मोबदला दिला पाहिजे, अशी मागणी कृषी अभ्यासकांनी केली.
४८ हजार ४३५ विमाधारक शेतकरी कर्जदार
यंदाच्या खरिप हंगामासाठी जिल्ह्यातील ४८ हजार ४३५ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. कर्जदार शेतकºयांना बंधनकारक असल्याने ही संख्या वाढू शकली; अन्यथा १० हजार शेतकरीदेखिल स्वत:हून पीक विमा काढू शकले नसते, अशी कृषी विभागातच चर्चा सुरू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार अशा ५१ हजार ६८७ शेतकऱ्यांचा विमा हफ्ता संबंधित कंपनीकडे जमा झाला आहे. तुटपुंजा मोबदला मिळाला तर पुढील हंगामात बिगर कर्जदार शेतकरी विम्यापासून पुन्हा दूरावू शकतात.

Web Title: Lessons to the non-loan farmers' crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.