डीटीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Published: July 26, 2016 12:59 AM2016-07-26T00:59:55+5:302016-07-26T00:59:55+5:30

मागील सात वर्षापासून शिक्षक भरती (सीईटी) परीक्षा झालेली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड पदवीधारक बेरोजगार आहेत.

Lessons of students in DTED syllabus | डीटीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

डीटीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

Next

केवळ दोन अर्ज : अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता 
परिमल डोहणे  चंद्रपूर
मागील सात वर्षापासून शिक्षक भरती (सीईटी) परीक्षा झालेली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड पदवीधारक बेरोजगार आहेत. त्यामुळे २१ जुलैपासून सुरू झालेल्या डीटीएड आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे पाच दिवस उलटूनही जिल्ह्याभरात केवळ २ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहे. यावरुन डीटीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी ९ जुनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र डीटीएड झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शाश्वती नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. पण काही संस्था चालकांनी या प्रवेश प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे ही प्रक्रिया दोन महिने बंद होती.
२१ जुलैपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झाली असून ही प्रक्रिया १ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचा डीटीएडकडे कल नसल्यामुळे पाच दिवसानंतर जिल्ह्यात फक्त दोनच आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. पुर्वी हमखास नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघीतले जायचे. डीएडला प्रवेश मिळवण्यासाठी चडाओढ असायची. तर बहुतेकजण प्रवेश मिळवण्यासाठी वारेमाप पैसे मोजायचे. त्यामुळे अनेक खाजगी कॉलेज वाढले. त्यातच मागील सात वर्षापासून सीईटीची परीक्षा झाली नाही.
सन २०१० मध्ये केंद्रीय शिक्षक भरती झाली. त्यानंतर आजपर्यंत एकदाही शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे अनेक डीटीएड पदवीधारकांची बेरोजगार फौज तयार झाली. त्यामुळे आजच्या घडीला डीटीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. परिणामी यावर्षी अनेक विद्यालयातील जागा रिक्त राहण्याचे चिन्ह दिसून येत आहेत.

प्रथमच आॅनलाईन प्रक्रिया
डीटीएड प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया ही यावर्षी पहिल्यांदाच सुरु करण्यात आली आहे. पुर्वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रमाणात आॅनलाईन प्रक्रिया अधिक क्लिष्ट आहे. पुर्वी डायट कॉलेजमधून प्रवेश अर्ज घेऊन तो भरावा लागत होता. मात्र आता आॅनलाईन प्रवेश अर्ज भरायचा, त्यानंतर कागदपत्र पडताळणी करायची, मग प्रपत्र जमा करायचे, ही प्रक्रिया यावर्षीपासून पहिल्यांदाच सुरु करण्यात आली आहे.

आयडीयल बॅचलाही विद्यार्थी मिळेनात
जिल्हास्तरीय डायट कॉलेज म्हणजेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये ४५ विद्यार्थ्यांची एक बॅच असते. शासकीय महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क ३ हजार २०० व इतर महाविद्यालयाचे शुल्क १२ हजार रुपये आहे. त्यामुळे या शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ असायची. पुर्वी यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण लागायचे. त्यामुळे या बॅचला आयडीयल बॅच असे संबोधले जायचे. मात्र आता या बॅचलासुद्धा विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत.

शिक्षकांची भटकंती
जिल्ह्यात विनाअनुदानीत कॉलेजच्या संस्था भरमसाठ आहेत. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी विनाअनुदानीत कॉलेजचे शिक्षक भटकंती करीत आहेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळी आमीष दाखवून प्रवेश घेण्यासाठी सांगत आहेत. मात्र बेरोजगांराची वाढती संस्था पाहून अनेक विद्यार्थी डीटीएडला प्रवेश घेण्यासाठी नकार दर्शवित आहेत.

Web Title: Lessons of students in DTED syllabus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.