पर्यावरणावर विद्यार्थ्यांना धडे

By admin | Published: October 22, 2014 11:16 PM2014-10-22T23:16:00+5:302014-10-22T23:16:00+5:30

तरुण पर्यावरणवादी मंडळ ब्रह्मपुरी, वनविभाग ब्रह्मपुरी व श्री राजाराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय आंबोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय पर्यावरण शिक्षण शिबिर घेण्यात आले.

Lessons for students on the environment | पर्यावरणावर विद्यार्थ्यांना धडे

पर्यावरणावर विद्यार्थ्यांना धडे

Next

शंकरपूर : तरुण पर्यावरणवादी मंडळ ब्रह्मपुरी, वनविभाग ब्रह्मपुरी व श्री राजाराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय आंबोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय पर्यावरण शिक्षण शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सकाळी ७ वाजेपासून संतोष कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जंगल भ्रमणाने करण्यात आली. यात वनस्पतीची ओळख व फायदे, वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा व प्राण्यांच्या विष्ठा यावर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या दुसऱ्या सत्रात वनऔषधी व वनस्पतीची ओळख या विषयावर संयुक्त वनविभागाचे व्यवस्थापन समितीचे आजीवन प्रचारक खोब्रागडे, वन्यप्राण्याचे संरक्षण या विषयावर ब्रह्मपुरीचे उपवनरक्षक आशिष ठाकरे, मानव व पर्यावरण या विषयावर अवार्ड संस्था नागभीडचे गुणवंत वैद्य, वनाची गरज या विषयावर चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी आडेवार, साप विषयावर जगदीश पेंदाम तर विषारी साप चावल्यास प्रथोमपचार या विषयावर डॉ. डाखोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतरच्या सत्रात तरुण पर्यावरणवादी मंडळाचे अमोद गौरकार यांच्या सुत्र संचलनात पर्यावरण प्रश्न मंजुषा घेण्यात आली. अचुक उत्तर देणाऱ्यास साप व मानव या पुस्तकाचे बक्षीस देण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मुंगले व रंगारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सतीश भजभुजे, प्रास्ताविक विरेंद्र हिंगे तर आभार मोरेश्वर पांगुळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वनविभागाचे वनपाल किर्तने, वनरक्षक सुरसाऊत, ठाकरे, सोयाम, धुर्वे, वनमजुरासह मंडळाचे आशु हजार, योगेश पचारे, अमित शिवनकर, सोनू बावणकर, शुभम कामडी, शुभम शिवरकर, गोलु मसाम, संकेत गजपूरे, महेश शिवरकर यांनी सहकार्य केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Lessons for students on the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.