शेतकऱ्यांना दोनदा पिके घेण्यास प्रवृत्त करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:25 AM2018-04-27T00:25:59+5:302018-04-27T00:25:59+5:30

राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील शेतकºयांना वर्षातून किमान दोन वेळा पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरमधील रब्बी हंगामातील लागवड क्षेत्रामध्ये वाढ करण्याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केल्या.

Let the farmers take two crops | शेतकऱ्यांना दोनदा पिके घेण्यास प्रवृत्त करावे

शेतकऱ्यांना दोनदा पिके घेण्यास प्रवृत्त करावे

Next
ठळक मुद्देआशुतोष सलिल : जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील शेतकºयांना वर्षातून किमान दोन वेळा पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरमधील रब्बी हंगामातील लागवड क्षेत्रामध्ये वाढ करण्याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केल्या. कृषी विभागातर्फे गुरुवारी स्थानिक नियोजन भवनात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे यांच्यासह जिल्ह्यातील कृषी व अन्य प्रमुख विभागाच्या अधिकाºयांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये आगामी वर्षाचे नियोजन करताना उपलब्ध बियाणे, खते, पावसाची उपलब्धता, पीक कर्जाची उपलब्धता, बँकेकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, किसान क्रेडीट कार्ड वाटप, प्रधानमंत्री कृषी सिंचाई, केंद्रिय सिंचन योजना याशिवाय जिल्ह्यातील कापूस पेरणाऱ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या चोर बीटी बियाण्याच्या महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये आगामी महिन्यात गावागावात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये कृषी सहायकांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना बोंडअळीचा संभाव्य प्रादुर्भाव आणि आमिष दाखवून विकल्या जात असलेल्या चोर बीटी बियाण्याबद्दल माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजवाडे यांनी या आढावा बैठकीत जिल्ह्यातील कृषिविषयक समस्यांची मांडणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा कमी होत असल्याबद्दल कारणे जाणून घेतली.
बोंड अळीचा प्रादुर्भाव असताना कापसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयावर शेतकऱ्यांचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये
जिल्ह्यातील सर्व बँकांना पिक कर्ज वाटपासाठी निर्धारित उद्दिष्ट दिले आहे. एकाही शेतकºयाला बँकेतून निराश होऊन परत जावे लागणार नाही. याबाबत बँकांनी नियोजन करावे, शेतकऱ्यांना या हंगामासाठी आवश्यक असणारे पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिले. मे महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून या काळात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आवश्यक असणाºया बियाण्यांची उपलब्धता तसेच खतांची आवश्यकता याबाबतही आढावा घेण्यात आला.
विविध योजनांचा आढावा
या बैठकीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये शाश्वत जलसाठे निर्माण करण्याच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहे. तथापि शाश्वत सिंचन वाढत असताना जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक घेण्यास शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र का आहे, याबाबत चर्चा झाली. या हंगामामध्ये रब्बी पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यासाठी कृषी विभागाच्या सर्व शाखांनी एकत्रित येऊन योजनेच्या विस्तारिकरणात लक्ष वेधावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यांमध्ये ठिंबक व सूक्ष्म सिंचन वाढविण्यात यावे. मागेल त्याला विहीर या योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केली.

Web Title: Let the farmers take two crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.