‘फायर वॉचर’ला बारमाह काम द्या

By admin | Published: July 11, 2016 12:51 AM2016-07-11T00:51:39+5:302016-07-11T00:51:39+5:30

जंगलाला दरवर्षी आग लागत असते. तो वणवा विझविण्याचे काम फायर वॉचरकडे दिले जाते. ते काम संपल्यावर फायर वॉचरना वन खात्याने ...

Let fireworks work for the next | ‘फायर वॉचर’ला बारमाह काम द्या

‘फायर वॉचर’ला बारमाह काम द्या

Next

रमेशचंद्र दहिवले : फायर वॉचर मेळावा
चंद्रपूर : जंगलाला दरवर्षी आग लागत असते. तो वणवा विझविण्याचे काम फायर वॉचरकडे दिले जाते. ते काम संपल्यावर फायर वॉचरना वन खात्याने इतर कामे देऊन त्यांना बारमाही कामासाठी सामावून घ्यावे, अशी मागणी सीटूचे जेष्ठ नेते प्रा. रमेशचंद्र दहिवले यांनी केली.
सीटू प्रणित विदर्भ वन कामगार संघटनेच्या वतीने फायचर वॉचरचा मेळावा बंडू उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी प्रा. दहिवले बोलत होते. ते म्हणाले की, वनविकास महामंडळ अंतर्गत फायर वॉचर गेल्या २५ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांना १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जंगलाला लागलेली आग विझविण्याच्या कामाकरिता लावण्यातयेते. नियमितपणे हे कामगार दरवर्षी कामावर येतात. वनविकास महामंडळात नवनवीन कामगारांना काम दिले जाते. मात्र फायर वाचरला जाणीवपूर्वक डावलण्यात येते. तेव्हा फायर वॉचरला बारमाही काम देण्यात यावे, असेही त्यांनी सागितले.
प्रास्ताविक भाषणात मनोहर जुमनाके म्हणाले, उन्हाळ्यात कामगारांकडून जोडा व गणवेश यांचे माप घेण्यात आले. फायर सिझन संपून गेला तरी जोडे आणि गणवेश तर सोडाच टॉर्चदेखील फायर वाचरला देण्यात आला नाही.
चरणदास मुंजनकर म्हणाले, आम्ही काम करण्यास तयार आहो. आमची सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन वनविकास महामंडळाचे कामावर आम्हाला घेण्यात यावे. रत्नपाल आत्राम यांच्या आभार प्रदर्शनाने मेळावा संपला.
मेळावा यशस्वी करण्याकरिता सत्यपाल कुमरे, बंडू उथाने, कैलास नन्नावरे, तुलाराम भुरकुंडे, मारोती आत्राम, प्रभाकर टेकरे, रामचंद्र दुधलवार, कालीदास मंगाम, नियोगी नागदेवते यांनी विशेष परिश्रम घेतले, असे शरद ताजने यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Let fireworks work for the next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.