बल्लारपूरला रोजगारासाठी आदर्श शहर बनवू

By admin | Published: October 11, 2016 12:51 AM2016-10-11T00:51:12+5:302016-10-11T00:51:12+5:30

शहराच्या विकासासाठी १०० कोटी रूपयांची विकास कामे करण्याचा शब्द मी दिला होता.

Let us make Ballarpur an ideal city for employment | बल्लारपूरला रोजगारासाठी आदर्श शहर बनवू

बल्लारपूरला रोजगारासाठी आदर्श शहर बनवू

Next

सुधीर मुनगंटीवार : विकासासाठी ११४ कोटी उपलब्ध
बल्लारपूर : शहराच्या विकासासाठी १०० कोटी रूपयांची विकास कामे करण्याचा शब्द मी दिला होता. प्रत्यक्षात केवळ एका वर्षातच ११४ कोटी रुपए शहराच्या विकासासाठी देण्यात आले आहे. भविष्यात विकासाची अनेक कामे शहरात होणार आहे. ही कामे होत असतांनाच शहरातील युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. त्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काम सुरू आहे. लवकरच हे शहर रोजगाराच्याबाबतीत आदर्श बनवू, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वैशिष्ट्यपूर्ण निधीतून शहरात २० कोटीची विकास कामे होत आहे. त्यातील वेगवेगळ्या सात कामांचे भूमिपूजन सोमवारी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर कामे केली जात आहे. पुढे अनेक कामे होणार आहे. विकास कामांसोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काम सुरू आहे. येत्या काळात बल्लारपूर शहर आदर्श शहर बनवू,असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या नाली, रस्ता कामांमध्ये कादरिया मस्जिद ते काटागेट मुख्य रस्ता तसेच कादरीया चौक ते राज बहाद्दुर दुबे यांच्या घरापर्यंत १ कोटी ९० लाख, अब्दुल कलाम चौक ते केजीएन शाळा ९४ लक्ष, भारत चौक ते अब्दुल हमीद चौक तसेच अब्दुल हमीद चौक ते देविदास बोडे यांच्या घरापर्यंत १ कोटी ७ लाख, राऊत चक्की ते कळसकर यांच्या घरापर्यंत ४२ लाख, छोटा हनुमान मंदिर ते धम्मदीप चौक २५ लाख, उमिया हॉटेल ते खनके गुरूजी यांच्या घरापर्यंत ८८ लाख, स्वामी मिस्त्री यांच्या घरापासून राकेश पान सेंटरपर्यंत ६ लाख या कामांचा समावेश आहे.(तालुका प्रतिनिधी)

चेहरामोहरा बदलणार
टप्प्याटप्प्याने बल्लारपूर शहरातील प्रत्येक रस्त्याचे काम होणार आहे. येत्या तीन वर्षांत एकही रस्ता कच्चा राहणार नाही. या शहरात १० कोटी रुपए खर्चून अंत्याधुनिक बसस्थानक होत आहे. २६ कोटी रुपए खर्चाचे मैदान होणार आहे. शहराची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ४० कोटी रुपए खचार्ची पाणीपुरवठा योजना करतो आहे. या योजनेनंतर शहराला २४ तास पाणी उपलब्ध राहील. त्यानंतर महिलांना पाण्यासाठी रांगेत राहावे लागणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बल्लारपूर शहरालगत १२२ एकर जागेवार देशातील २६ वी सैनिकी शाळा उभी राहत आहे. या शाळेचे कामही लवकरच सुरु होणार आहे. याशिवाय अत्याधुनिक विश्रामगृह, बॉटनिकल गार्डन होत आहे. शहरातील नागरिकांच्या रोजगार, आरोग्य आणि निवासासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले. शासनाने गरिबांच्या घरासाठी चांगली योजना आखली आहे. या घरांसाठी शासन २.५० लक्ष रुपए उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित रक्कम बँकांमार्फत अल्प व्याजदरात उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

Web Title: Let us make Ballarpur an ideal city for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.