कॅन्सरमुक्त भारत बनवू या : डॉ. प्रिया गणेशकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:44+5:302021-09-07T04:33:44+5:30
भद्रावतीत नि:शुल्क स्त्री कर्करोग पुर्वनिदान, औषधोपचार शिबिर भद्रावती : स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ...
भद्रावतीत नि:शुल्क स्त्री कर्करोग पुर्वनिदान, औषधोपचार शिबिर
भद्रावती : स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व फॉग्सी स्त्रीरोग ऑन्कोलॉजी कमिटी, स्त्रीरोग संघटना, चंद्रपूर व ग्रामीण रुग्णालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क स्त्री कर्करोग पूर्वनिदान, औषधोपचार व जनजागृती शिबिर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आले.
स्त्रीरोग ऑन्कोलॉजी कमिटी, मुंबईच्या अध्यक्ष डॉ. प्रिया गणेशकुमार यावेळी बोलताना म्हणाल्या, सर्व्हाईकल कॅन्सरमुक्त भारत अभियान राबवून, कॅन्सरमुक्त भारत बनवू या. यासाठी महिलांनी जागृत असणे आवश्यक आहे. शरीराकडे लक्ष देऊन लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. आहार, व्यायाम व शरीरातील बदलांकडे लक्ष द्यावे. सतर्कतेने वेळीच तपासणी व उपचार घेऊन कॅन्सर रोखू शकतो.
यावेळी ३५ वर्षांवरील लक्षणे असलेल्या महिलांची अत्याधुनिक मशीनद्वारे कॉल्पोस्कोपी तपासणीद्वारे गर्भाशयमुखाची मोफत तपासणी करण्यात आली. जवळपास ७० महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.
सोबतच ९ ते २८ वयोगटातील काही निवडक मुलींना घातक एचपीव्ही विषाणूपासून म्हणजेच कर्करोगापासून वाचविण्यासाठी शिबिरात लस देण्यात आली.
यावेळी चंद्रपूर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्ष डॉ. कविता गांधी, सचिव डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्षा डॉ. मनीषा घाटे, सहसचिव डॉ. वृषाली बोंदगुलवार, सहसचिव डॉ. वंदना रेगुंडवार, कोषाध्यक्ष डॉ. समृद्धी आईंचवार, सदस्य डॉ. नगिना नायडू, नीलिमा शिंदे, सुषमा शिंदे, ईनरव्हील क्लबच्या डॉ. माला प्रेमचंद, सुनंदा खंडाळकर, प्रेमा पोटदुखे आदी उपस्थित होत्या.