शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविणार पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:00 AM2021-09-02T05:00:30+5:302021-09-02T05:00:30+5:30
राजकीय पक्षांचे हजारोंच्या उपस्थितीत मोर्चे आंदोलने होत आहेत. लग्नसोहळे सुरू आहेत. सर्व प्रकारची दुकाने सुरू आहेत. अशा वेळेस फक्त ...
राजकीय पक्षांचे हजारोंच्या उपस्थितीत मोर्चे आंदोलने होत आहेत. लग्नसोहळे सुरू आहेत. सर्व प्रकारची दुकाने सुरू आहेत.
अशा वेळेस फक्त शाळाच बंद का? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक)ने उपस्थित केला आहे. शाळा बंद ठेवणे घातक असल्याचे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अनंत फडके यांनी म्हटले आहे. पूर्वतयारी करून शाळा उघडायला प्राथमिक शाळांपासून सुरुवात करावी, अशी शिफारस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.
चाचण्यांच्या तुलनेत कोविड १९च्या बाधितांना दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या आणि दर लाख लोकसंख्येमागे रोज वीसपेक्षा कमी नवीन रुग्ण असलेल्या जिल्ह्यांत शाळा सुरू कराव्यात, अशी शिफारस बाल आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने केली असूनही महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सने शाळा सुरू न करण्याची शिफारस केली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून रुग्ण नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक)ने केली आहे.