पांदन रस्ता गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:00 AM2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:48+5:30
शेतकऱ्यांची शेतात जाणारी वाट सुलभ व्हावी, या दृष्टीकोनातून शासन स्तरावरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत स्थानिक ग्राम पंचायत अंतर्गत तालुका परिसरामध्ये पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावर गावातील मजुरांकडूनन मातीकाम व मुरुम काम करण्यात आले. तर काही रस्त्याचे खडीकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तयार करण्यात आलेला पांदन रस्ता पाण्याने वाहून गेला आहे. परिणामी रस्त्यावर मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरुन शेतावर जातांना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पांदन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे.
शेतकऱ्यांची शेतात जाणारी वाट सुलभ व्हावी, या दृष्टीकोनातून शासन स्तरावरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत स्थानिक ग्राम पंचायत अंतर्गत तालुका परिसरामध्ये पांदण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावर गावातील मजुरांकडूनन मातीकाम व मुरुम काम करण्यात आले. तर काही रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. परंतु, काही दिवसातच बहुतांश पांदन रस्ते पावसामुळे उखडून गेले आहेत. पाण्याचा प्रवाह असलेल्या जागी छोटे-मोठे पाईप टाकण्यात आले होते. मात्र पाण्यामुळे येथील रस्ता वाहून गेला तसेच हे पाईपही वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकºयांना सिंचनाचीही अडचण येत असून शेतकºयांना शेतावर जाण्याची पंचाईत होत आहे.
शेतावर जाताना जीवघेणी कसरत
पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकलेल्या ठिकाणचा रस्ता वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे शेतावर जाण्यास अडचण येत असल्याने कसेबसे पाईप टाकून रस्ता केला आहे. परंतु, तलावाचे पाणी येणाऱ्या सांडव्याच्या ठिकाणी काहीच व्यवस्था नसल्याने त्या नाल्यातून चार ते पाच फुट पाण्यामधून बैलबंडी घेवून शेतकऱ्यांना जावे लागते. मात्र यामुळे धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.