शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:39+5:302021-02-18T04:50:39+5:30
वरोरा बाजार समिती येथून अमोल गजानन देवतळे यांनी शेतमाल खरेदी-विक्रीचा परवाना काढला होता. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला. अनेक ...
वरोरा बाजार समिती येथून अमोल गजानन देवतळे यांनी शेतमाल खरेदी-विक्रीचा परवाना काढला होता. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला. अनेक शेतकऱ्यांना रक्कम दिली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारींची शहानिशा बाजार समितीने करीत त्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द केला. सदर व्यापारी शेतमाल खरेदी करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याकडे शेतमाल विकल्यास त्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहील असे बाजार समितीने नमूद केले आहे. यासोबतच अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतमाल खरेदी करीत आहे. यामध्ये वजन व रकमेत तूट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात शेतमाल विकावा व पावती घ्यावी, असे आवाहन बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, सचिव चंद्रसेन शिंदे यांनी केले आहे.