जीवनानुभवाचे सकारात्मक दृष्टीने लेखन होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:30 AM2021-02-09T04:30:51+5:302021-02-09T04:30:51+5:30

चंद्रपूर : मानवी जीवनात बरे-वाईट अनुभव येत असतात. त्यातून आपण खूप काही शिकतो. त्या जीवनानुभवाचे ...

Life experiences need to be written in a positive way | जीवनानुभवाचे सकारात्मक दृष्टीने लेखन होणे आवश्यक

जीवनानुभवाचे सकारात्मक दृष्टीने लेखन होणे आवश्यक

Next

चंद्रपूर : मानवी जीवनात बरे-वाईट अनुभव येत असतात. त्यातून आपण खूप काही शिकतो. त्या जीवनानुभवाचे उत्तम लेखन झाले पाहिजे. साहित्य लेखनातून जीवनाला नवी ऊर्जा मिळते, असे मत पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी येथे केले.

नक्षत्राचं देण काव्यमंच द्वारा आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक यवनाश्व गेडकर यांच्या स्मरणातली निरंजना या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

रमाई जयंती दिनी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मिल्ट्री स्कूलचे माजी प्राचार्य तथा पर्यावरण स्तंभलेखक विजय मार्कंडेवार, भाष्यकार प्रा. डाॅ. राज मुसने, जि.प.चे सेवानिवृत्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीधर मालेकर, ग्रंथलेखक यवनाश्व गेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यवनाश्व गेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्मरणातली निरंजना या पुस्तकात लेखकांनी व्यक्त केलेली तळमळ लक्षात घेण्यासारखी आहे, त्यात दिवंगत पत्नीविषयीच्या आठवणीचा पूर दिसून येतो, असे मत प्रा.डाॅ. मुसने यांनी व्यक्त केले. सांसरिक अनुबंंध आणि मानसिक साहचर्याचे दर्शन घडते, असे मत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी गणित विषयात गोंडवाना विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्या अभय घटे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन नामदेव गेडकर तर आभार नारायण सहारे यांनी मानले. यावेळी प्रा. श्रावण बानासुरे, रमेश रामटेके, प्राचार्य डोंगे, प्रकाश चांभारे, विलास उगे, सरिता गव्हारे, देवराव कोंडेकर, मंजुषा खानेकर, अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, श्रीकांत प्रतापवार, प्रा. मोरे, डाॅ. धर्मा गांवडे, हेमश्री मेश्राम आदींची उपस्थिती होती.

Web Title: Life experiences need to be written in a positive way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.