‘आयुष्यमान भारत’ ही सर्वात महत्त्वाची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:05 PM2019-02-14T23:05:09+5:302019-02-14T23:05:28+5:30

सामान्यातल्या सामान्य माणसाला आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर आरोग्याच्या काळजीसोबत उपचाराचे ओझे डोक्यावर राहू नये, यासाठी आयुष्यमान भारत ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाची योजना आहे.

'Life in India' is the most important scheme | ‘आयुष्यमान भारत’ ही सर्वात महत्त्वाची योजना

‘आयुष्यमान भारत’ ही सर्वात महत्त्वाची योजना

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यात एक लाख गोल्डन ई-कार्डचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सामान्यातल्या सामान्य माणसाला आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर आरोग्याच्या काळजीसोबत उपचाराचे ओझे डोक्यावर राहू नये, यासाठी आयुष्यमान भारत ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांना मिळावा. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने गरीब, सामान्य कुटुंबाचे देवदूत बनावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, अर्थात आयुष्यमान भारत योजना संदर्भात मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत गावपातळीपासून तर मुख्यालयापर्यंत काम करणाऱ्या सर्व कर्मचाºयांचा सहभाग होता. या कर्मचाºयांना मार्गदर्शन करताना त्यांनी आजारी माणसाच्या आयुष्यात देवदूत बनून जा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू करताना परवडणारी आरोग्यसेवा आणि प्रतिबंधक आरोग्यसेवा या दोन्ही गोष्टीवर लक्ष करण्याचे आवाहन केले होते. हे लक्ष आपण पूर्ण करू या, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सीएससीचे राज्य प्रमुख वैभव देशपांडे, डॉ.नायगावकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, सभापती अर्चना जीवतोडे, सभापती संतोष तंगडपल्लीवार आदींची उपस्थिती होती. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.
यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, आपल्याकडे आरोग्य यंत्रणेमध्ये मनुष्यबळासह काही कमतरता आहे. मात्र जे उपलब्ध संसाधने आहेत. जी काही यंत्रणा सध्या कार्यरत आहे. त्यातील उत्तमात उत्तम सामान्य माणसाला मिळावे, यासाठी सगळ्या कर्मचाºयांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या योजनेसाठी महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याची निवड झाली असून गोल्डन कार्ड लाभार्थ्यांना काढण्याकरिता कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार केंद्रात सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे सांगितले.
प्रा. आरोग्य केंद्रांना आठ कोटी
स्वातंत्र्यानंतर महत्त्वाची ही योजना सुरू झाली असून आर्थिक परिस्थिती नसताना आजार घरात येणे हा अतिशय कठीण प्रसंग असतो. रुग्णांची संख्या कमी व्हावी, सर्वांचे आरोग्य उत्तम असावे, रुग्ण सेवा सहज सुलभ मिळावी, सार्वजनिक आरोग्य शिबिरामध्ये एकही रुग्ण उपस्थित राहू नये, अशी आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी आठ कोटी रुपये विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले आहे. लवकरच टाटा ट्रस्टच्या मदतीने कॅन्सर हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम सेवा द्यावी, सोबतच आलेल्या रुग्णाला अतिशय उत्तम वागणूक मिळावी. उपचार करणाºयांच्या डोळ्यात देवदूत असावा, अशी अपेक्षाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Web Title: 'Life in India' is the most important scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.