जिल्हा परिषदेत अवयदान कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:56 AM2017-08-30T00:56:11+5:302017-08-30T00:56:28+5:30

जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी महाअवयवदान कार्यक्रम घेण्यात आला. जनतेत जनजागृती होऊन अवयवदानाला चालना मिळावी, ....

Limit Program in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत अवयदान कार्यक्रम

जिल्हा परिषदेत अवयदान कार्यक्रम

Next
ठळक मुद्देमहाअवयवदान महोत्सव : आज जिल्हाभरात विविध स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेमध्ये मंगळवारी महाअवयवदान कार्यक्रम घेण्यात आला. जनतेत जनजागृती होऊन अवयवदानाला चालना मिळावी, याकरिता राज्यस्तरावर महाअवयवदान महोत्सव २०१७ चे २९ व ३० आॅगस्ट या दिवशी आयोजित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातही दोन दिवस विविध प्रकारच्या उपक्रमाव्दारे अवयवदान जनजागृतीसाठी महाअवयवदान महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, शिक्षणाधिकारी राम गारकर, जिल्हा अवयवदान समन्वय अधिकारी डॉ.गजानन राऊत, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांना महा अवयवदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.
सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा अवयवदान समन्वय समितीचे अध्यक्ष आशुतोष सलिल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून सदर अभियान जिल्हयातील सर्व ग्रामीण भागात संवर्ग विकास अधिकारी तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकाºयांना सूचना देऊन राबविण्यात येत आहे. तसेच अवयवदान महोत्सवाप्रसंगी सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून या सभेत अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. ३० आॅगष्ट रोजी गावातील प्रत्येक घरासमोर अवयवदानासंबंधी रांगोळी काढण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले असून यामध्ये उत्कृष्ट रांगोळी काढणाºयांना प्रोत्साहनपर रोख बक्षिस देण्यात येणार आहेत.

Web Title: Limit Program in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.