लाईन ट्रिपिंगमुळे अनेकांच्या घरांतील विद्युत उपकरणे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:11+5:302021-09-08T04:34:11+5:30

राजुरा तालुक्यातील विरूर येथे स्वतंत्र विद्युत फिडर आहे. मागील काही महिन्यांपासून सतत लाईन ट्रिपिंग होत आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे ...

Line tripping caused electrical appliances to burn in many homes | लाईन ट्रिपिंगमुळे अनेकांच्या घरांतील विद्युत उपकरणे जळाली

लाईन ट्रिपिंगमुळे अनेकांच्या घरांतील विद्युत उपकरणे जळाली

Next

राजुरा तालुक्यातील विरूर येथे स्वतंत्र विद्युत फिडर आहे. मागील काही महिन्यांपासून सतत लाईन ट्रिपिंग होत आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे करण्यासाठी व बँकेतील व्यवहार करण्यासाठी परिसरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विरूर येथे बँक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून येथे मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येतात. लाईन ट्रिपिंगमुळे नागरिकांसह व्यापारी बांधव त्रस्त आहेत. अशातच परिस्थितीत रात्री सतत लाईन येणे-जाणे चालू होते. यामुळे इंदिरानगर व चिकलकरी गुळा येतील अनेकांच्या घरचे बल्ब, सिलिंग फॅन, टीव्ही, फ्रिज व विद्युतवर चालणारी उपकरणे जळाली. नुकसान झालेल्या उपकरणाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी इंदिरानगर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कुळमेथे, पुरुषोत्तम चाहारे, बंडू झाडे, शंकर दरेकर, बंडू वेटी, अजित सिंग टाक, रामुसिंग टाक, गुरुजीसिंग टाक यांनी केली आहे.

070921\img-20210907-wa0056.jpg

डीपी

Web Title: Line tripping caused electrical appliances to burn in many homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.