७० लाखांची दारू अन् गुटखा जप्त; ९० जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 01:49 PM2024-05-15T13:49:27+5:302024-05-15T13:50:08+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: चार महिन्यात ९० जणांना ठोकल्या बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू विक्रेते व अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. मागील चार महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध ११ कारवाया करुन १८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ४८ लाख ४२ हजार ८२५ रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. अवैध दारू विक्रीच्या ७१ कारवाया करुन ७२ जणांना बेड्या ठोकल्या असून २२ लाख ६२ हजार ९८५ रुपयांची दारू जप्त केली आहे. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली असली तरीही अनेकजण सुगंधित तंबाखूची विक्री करत आहेत. त्यामुळे कारवाई करण्यात आल्या.
९० जणांवर कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू व अवैध दारू विक्रेत्यांविरुद्धची मागील चार महिने केलेल्या कारवाईची आकडेवारी बघितल्यास तब्बल ७१ लाख पाच हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ९० जणांना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली.
निवडणुकीनंतर कारवाईला गती
१९ एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईला खरा वेग आला आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अवैध व्यावसायिकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सुगंधित तंबाखू, रेती तस्करी, अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.
काय जप्त केले?
इगल, हुक्का अन् गुटखा : मागील चार महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन इगल, हुक्का, गुटखा असा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.
२२ लाखांची दारू जप्त : १ जानेवारी ते एप्रिल २०२४ या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ लाख ६२ हजार ९८५ रुपयांची दारू जप्त केली आहे.
अवैध रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या :
जिल्ह्यात शिवसेना कोणाच्या बाजूने आहे? सेना जिल्हाप्रमुख, आणि तालुका प्रमुखांची भूमिका काय? त्यांच्याशी बोलून आहे. आणि तालुका प्रमुखांची भूमिका काय? त्यांच्याशी बोलून आहे. आणि तालुका प्रमुखांची भूमिका काय? त्यांच्याशी बोलून आहे. शहरप्रमुख आणि तालुका आहे.
अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले
स्थानिक गुन्हे शाखेच्या सततच्या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
जिल्हाभरात पोलिसांची सुरु आहे गस्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण जिल्हाभरात गस्त सुरु केली असून कारवाई करण्यात येत आहे.