कर्जमुक्तीसाठी ५० हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:46+5:30

यापूर्वी जिल्ह्यातील राजुरा व साखरी येथे २४ फेब्रुवारीला मोहीम राबविण्यात आली होती. आज राज्य शासनाने चंद्र्रपूर, धुळे, हिंगोली, वाशिम, उस्मानाबाद अशा पाच जिल्ह्यांमधील याद्या जाहीर केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी यादी डाऊनलोड करण्याचे काम सुरू केले होते. शनिवार दुपारपर्यंत सर्व गावांमध्ये या याद्या प्रकाशित होतील, असेही उपनिबंधक खाडे यांनी सांगितले.

A list of 50,000 farmers will be released for debt relief | कर्जमुक्तीसाठी ५० हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

कर्जमुक्तीसाठी ५० हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

Next
ठळक मुद्देउपनिबंधकांची माहिती : आधार प्रमाणिकीकरणानंतरच कर्जमुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. त्यामुळे राजुरा व साखरी येथील प्रमाणिकरण मोहिमेनंतरच जिल्ह्यात ही मोहीम सर्वत्र राबविण्यात येईल. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आता शनिवारपासून जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रमाणिकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील राजुरा व साखरी येथे २४ फेब्रुवारीला मोहीम राबविण्यात आली होती. आज राज्य शासनाने चंद्र्रपूर, धुळे, हिंगोली, वाशिम, उस्मानाबाद अशा पाच जिल्ह्यांमधील याद्या जाहीर केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी यादी डाऊनलोड करण्याचे काम सुरू केले होते. शनिवार दुपारपर्यंत सर्व गावांमध्ये या याद्या प्रकाशित होतील, असेही उपनिबंधक खाडे यांनी सांगितले. या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधारकार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर आदी महत्त्वाच्या कागदपत्रांसह आपले आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये आधार प्रमाणिकरण झाल्याची खातरजमा करावी, असे आवाहनही खाडे यांनी केले. ज्या लोकांचे आधारकार्ड शनिवारपासून प्रमाणित करण्यात येईल त्यांच्याच बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत २ लाख जमा केले जाणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, शनिवारपासून सर्वत्र याद्या लागणार आहेत. सर्वांनी आपल्या आधारकार्डचे प्रमाणीकरण करावे. ही प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार असून पात्र शेतकऱ्यांनी मोहिमेचा लाभ घ्यावा. जिल्हा, तालुका व गाव पातळीवर महसूल व अन्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांनी या प्रक्रियेमध्ये आवश्यक मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकाºयांचे आवाहन
कर्जमुक्तीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी समन्वय ठेवावे. आधार प्रमाणिकरण हा टप्पा महत्त्वपूर्ण असल्याने ही प्रक्रिया गंभीरतेने करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

Web Title: A list of 50,000 farmers will be released for debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.