अंतिम सेवाज्येष्ठता यादीत घोळ
By admin | Published: April 10, 2017 12:46 AM2017-04-10T00:46:51+5:302017-04-10T00:46:51+5:30
आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने इयत्ता सहावी ते आठवीला शिकविण्यासाठी विषय शिक्षकांच्या
विषय शिक्षक : नव्याने यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करणार
चंद्रपूर : आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने इयत्ता सहावी ते आठवीला शिकविण्यासाठी विषय शिक्षकांच्या पदस्थापनेची कार्यवाही सुरु केलेली आहे. विषय शिक्षक या पदाकरिता विकल्प दिलेल्या पदविधर सहायक शिक्षक तसेच अपात्र उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची अंतिम सेवा जेष्ठता यादी नुकतीच ७ एप्रिलला प्रसिद्ध केलेली असून या यादीमध्ये प्रचंड चुका असल्याने शिक्षकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
शिक्षण विभागाने ७ एप्रिलला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे एक पत्र काढून यादीत काही त्रुट्या असल्यास दुरुस्तीसह १० एप्रिल २०१७ पर्यंत शिक्षण विभाग चंद्रपूर येथील कार्यालयात सादर करण्याविषयी म्हटलेले आहे. मात्र ८ आणि ९ एप्रिलला कार्यालायाल सुटी असल्यामुळे बऱ्याच शिक्षकांना या यादी संदर्भात माहिती नाही. ज्या शिक्षकांनी व्हॉटसपवर यादी पाहिलेली आहे, त्यात प्रामुख्याने काही शिक्षकांच्या रुजू तारखेत तसेच जन्मतारखेत चुका असल्याचे तसेच विषय शिक्षक म्हणून कार्यरत असतानाही काहींची नावे नव्याने घेण्यात येणाऱ्या यादीत समाविष्ठ केलेली आहेत. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अनेक शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मरा प्राथ शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सचिव किशोर उरकुंडवार यांचेसह मारोती जिल्हेवार, गजानन कहुरकक, जगदीश दुधे, विद्याचरण गोल्हर, अशोक टिपले, मारोती आनंदे, नामदेव कावळे, अनिल झाडे, संजय बट्टे, सुरेश जिल्हेवार, लक्ष्मण सोयाम, सुनील मामीडवार, विजय सातपुते, जहीर खान, नारायण तेल्कापल्लीवार, शंकर गोरे, बाळकृष्ण मसराम, काकासोहब नगारे, डेकाटे, राजेंद्र चांभारे, विद्या सयाम, प्रमादे बाविसकर, विनोद बारसागडे आदींनी नाराजी व्यक्त केली असून नव्याने यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करणार असल्याचे संघटनात्मक पत्रकार म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)