अंतर्मनाचा आवाज ऐका, ध्येय साध्य होईल
By admin | Published: January 11, 2016 12:59 AM2016-01-11T00:59:18+5:302016-01-11T00:59:18+5:30
देशाचा मूळ निवासी समाज असलेल्या कोयावंशीय गोंडीजनात परकिय टोळ्यांनी व्यसनाधिनता वाढविली.
नागेश घोडाम यांचे प्रतिपादन : मंगी (बु.) येथे गोंडी धर्म संमेलन
सास्ती : देशाचा मूळ निवासी समाज असलेल्या कोयावंशीय गोंडीजनात परकिय टोळ्यांनी व्यसनाधिनता वाढविली. त्याचा अनिष्ट परिणाम आमच्या समाज जीवनावर होत असून आम्ही विकासापासून कोसोदूर जात आहोत. मात्र मंगीवासीयांनी स्वच्छतेचा स्वीकार करुन व व्यसनाधिनतेचा ठोकर मारुन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांचा तो अंतर्मनाचा आवाज असल्याने तो प्रत्येकाने स्वत:च्या मनात रुजविल्यास कोणतेही यश किंवा ध्येय साध्य करण्यास वेळ लागणार नाही, अशी आर्त साद आदिलाबादचे (तेलंगणा) खासदार नागेश घोडाम यांनी घातली.
मंगी (बु.) येथील गोंडी धर्म संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पुसाम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आत्राम, सखु माझी, मसराम नागोराम, सिडाम आरजू, रावण इनवाथे, वीरेंद्र शाहा आत्राम, बाबुराव मडावी, दौलतराव कोरांगे, भीमराव मडावी, सीताराम कोडापे, शामराव कोटनाके, मनोज आत्राम, डॉ. निरांजन मेश्राम, नामदेव किन्नाके, दिवाकर कुळसंगे, कुंदा सलामे, राधा आत्राम, संभाजी लांडे, मुख्याध्यापक सीताराम मेश्राम, भुमक संघाचे अध्यक्ष संतोष मेश्राम उपस्थित होते.
मंगी बु. हे आदिवासी उपयोजनेतील व ९० टक्के गोंड समाज असलेले गाव आहे. येथे गेल्या पाच वर्षांपासून ग्राम स्वच्छता व व्यसनमुक्तीच्या माध्यमातून गावाला व्यसनमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे येथे गोंडी धर्माचे धर्म गुरु पहांदीपारी कुपारलिंगोचे स्मृती स्थळ पेनठाणा (मंदिर) व सल्लाशक्तीचे बांधकाम करता आले. त्यांचे पूजन व लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर तोडासे , चिन्नुपा कन्नाके, गणपत कोडापे, राजू कोडापे, जलपत कोडापे, रामू गेडाम, सुंगाजी तोडासे, पैकुजी मडावी, दादाजी तलांडे, श्यामराव कन्नाके, सीताराम आत्राम, चंदू तोडासे, गणपत आळे, गजानन तुमराम, विश्वश्वर मरस्कोल्हे, नामदेव कोडापे, लक्ष्मण मेश्राम, लचपा कन्नाके यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समिती अध्यक्ष परशुराम तोडासे यांनी केले. संचालन शंकर मेश्राम यांनी तर आभार बापुराव मडावी यांनी मानले. (वार्ताहर)