साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:27 PM2018-11-23T22:27:51+5:302018-11-23T22:28:25+5:30
अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा : अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रपट निर्माते प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी व्यक्त केले.
राज्यस्तरीय तिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून गडचांदूर नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, स्वागताध्यक्ष समाजसेवक गिरीधर काळे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अॅड. वामनराव चटप, पूर्वाध्यक्ष साहित्यिक मनोज बोबडे, ज्येष्ठ समीक्षक श्याम मोहोरकर, त. मु. अध्यक्ष शंकर अस्वले आदी उपस्थित होते. यावेळी अक्षर वाङमय पुरस्कार वितरण करण्यात आले. कवी गणेश भाकरे यांना अक्षरबाल वाङमय पुरस्कार, लातुर येथील कवी, लेखक डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांना अक्षर वाङमय समीक्षा पुरस्कार प्रा. नवनाथ गोरे यांना कादंबरी पुरस्कार, संघमित्रा खंडरे यांना कथा पुरस्कार, चंद्रकांत पोतदार यांना काव्य पुरस्कार, शंकुतला सोनार यांच्या चरित्र पुरस्कार तर रश्मी गुजराथी यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उमेश पारखे यांच्या ‘शुन्यात शोधतो मी’ कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अक्षर साहित्य कला प्रतिष्ठाणच्या वतीने कवी उमेश पारखी यांना नवांकुर पुरस्कार, समाजसेवक रामचंद्र पावडे यांना राष्टÑसंत सेवा पुरस्कार, मनोज भोजेकर यांना अक्षर कार्यकर्ता पुरस्कार, सदानंद बोरकर यांना नाट्यकलावंत पुरस्कार तर मयुर ऐकरे यांना अक्षर कला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक कवि किशोर कवडे यांनी केले. संचालन कवी रत्नाकर चटप तर आभार कवी अविनाश पोईनकर यांनी मानले. यावेळी राज्यभरातील कवी, साहित्यिक, गझलकार तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामदिंडीने दुमदुलले बिबी गाव
तिसऱ्या अभंग साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी बिबी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्यिकांसह जि.प. शाळेचे विद्यार्थी शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी सहभागी झाले. भजन आणि अभंगांनी गावकºयांची मने जिंकली.