कोरोनाच्या मृत्यूनंतर साहित्यही गायब; चंद्रपुरात एकच तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:19 AM2021-06-10T04:19:43+5:302021-06-10T04:19:43+5:30
मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत तर कोरोना मृतांची संख्या मोठी आहे. जिल्हाभरात २६ कोविड रुग्णालये ...
मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत तर कोरोना मृतांची संख्या मोठी आहे. जिल्हाभरात २६ कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या रुग्णाचा मोबाइल पळविल्याची घटना पुढे आली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच आपली सूत्रे हलविली. काही तासांतच मोबाइल मिळाला. याव्यतिरिक्त जिल्ह्यात कोणत्याच ठिकाणी दागिने अथवा साहित्य पळविल्याची तक्रार नसल्याची माहिती आहे.
बॉक्स
मोबाइल गायब
जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाजवळ मोबाइल होता; परंतु त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांना मोबाइल मिळाला नसल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली; परंतु तो मोबाइल तेथेच व्यवस्थित ठेवला होता. शहर पोलिसांनी लगेच तपास करून मोबाइल परत मिळवून दिला.
----
एकूण कोरोना रुग्ण -८३७५५
बरे झालेले रुग्ण- ८०८२२
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण १४४७
एकूण मृत्यू
१४८६
बॉक्स
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण प्राप्त तक्रारी ०१