साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब उमटते : किशोर मुगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:32 AM2021-09-17T04:32:59+5:302021-09-17T04:32:59+5:30
गोवरी : साहित्य समाजाचा आरसा आहे. साहित्यातून कवी, लेखकांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर विपुल लेखन केले आहे. साहित्यिकांनी समाजातील वास्तव ...
गोवरी : साहित्य समाजाचा आरसा आहे. साहित्यातून कवी, लेखकांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर विपुल लेखन केले आहे. साहित्यिकांनी समाजातील वास्तव साहित्यातून मांडत राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक कवी किशोर मुगल यांनी केले.
राजुरा येथील संत नगाजी महाराज सभागृहात सप्तरंग प्रकाशन आणि अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिभावंतांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी साहित्यिक किशोर मुगल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधिज्ञ व लेखक ॲड. जयंत साळवे, सप्तरंगचे अध्यक्ष राजुराचे ज्येष्ठ कवी मनोज बोबडे, अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर चटप, गझलकार रामकृष्ण रोगे, कामगार नेते मधुकर डांगे, कवी किशोर कवठे उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या कविसंमेलनात कवी नरेशकुमार बोरीकर, चंदू झुरमुरे, श्वेता चंदनकर, अरुण घोरपडे, विजय वाटेकर, प्रतीक डाखरे, नामदेव देवकते, विशाल शेंडे, स्वप्नील बोबडे, राजेश देवाळकर, शीतल कर्णेवार, प्रकाश काळे, प्रदीप मडावी, प्रवीण चौधरी, सूरज पचारे, डॉ. अर्चना जुनघरे, सुनील पोटे, गायत्री उरकुडे, अमोल नक्षिणे, चित्ररेखा धंदरे, हेमा लांजेकर, दिलीप पाटील, ॲड. मेघा धोटे, प्रतीक्षा वासनिक, शंकर लोडे, संतोष करदोडे यांनी समाजातील ज्वलंत प्रश्नावर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.