राहतात चंद्रपुरात; लायसन्स काढले परदेशाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:30+5:302021-07-15T04:20:30+5:30
शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण विदेशामध्ये जात आहेत. विदेशात दुचाकी, चारचाकी चालवायची असल्यास इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे असते. याशिवाय परदेशात ...
शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण विदेशामध्ये जात आहेत. विदेशात दुचाकी, चारचाकी चालवायची असल्यास इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे असते. याशिवाय परदेशात वाहन चालविल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे इंटरनॅशनल लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज करणाऱ्यांचे संपूर्ण कागदपत्र तपासून लायसन्स दिले जाते. हे लायसन्स काढताना पासपोर्ट व विदेशाचे जाण्याचे योग्य कारण असणे गरजेचे आहे. तेव्हाच लायसन्स दिले जाते. सन २०१६ ते २०२१ या सहा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील १२१ जणांनी विदेशी लायसन्स काढले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात लायसन्स काढणाऱ्यांची संख्या घटली आहे. सन २०२० मध्ये ६ तर २०२१ मध्ये ५ जणांनीच विदेशी लायसन्स काढले आहे.
बॉक्स
मुदत एक वर्षाचीच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रितसर अर्ज करून आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यात येते. या आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत फक्त एक वर्षभरासाठी असते. त्यानंतर पुन्हा हे लायसन्स रिन्यूव्हल करता येते.
पूर्वी ऑफलाइन पद्धतीने हे लायसन्स काढण्यात येत होते. आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारल्या जातात. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मुद्रित एकाधिक भाषा इतर देशांच्या अधिधारकांची माहिती सत्यापित करण्यास उपयुक्त ठरतात. वाहने चालविण्यास मदत होते.
परदेशातून परत आल्यानंतर लायसन्स पडताळणी करून घ्यावे लागते. वर्षभरानंतर या लायसन्सची मुदत संपत असते.
बॉक्स
तुम्हालाही काढायचेय का लायसन्स?
परदेशात वाहन चालविण्यासाठी लायसन्स काढायचे असेल, तर पासपोर्ट असणे गरजेचे आहे. लायसन्ससाठी पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र, व्हिसा आदी कागदपत्राच्या आधारे ऑनलाइन अर्ज करावे लागते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसमक्ष अर्जदाराची स्वाक्षरी घेण्यात येते. तसेच परदेशात जाण्याचे कारण उदा. नोकरी, शिक्षण, व्यवसाय कशासाठी जायचे आहे. याची प्राथमिक चौकशी केली जाते. संपूर्ण कागदपत्राची तपासणी केल्यानंतर व कागदपत्र उपप्रादेशिक कार्यालयात जमा केल्यानंतर परदेशात चालणारे लायसन्स दिले जाते.
बॉक्स
पर्यटन, नोकरी, व्यवसायासाठी परदेशात जाणारे नागरिक विदेशी वाहन परवाना काढत असतात. मागील सहा वर्षात १२१ जणांनी विदेशी लायसन्स मिळविले आहे. या लायसन्सची मुदत केवळ एक वर्षांसाठी असते. त्यानंतर रिन्यूव्हल करावे लागते. नाहीतर ते लायसन्स रद्द करण्यात येते. अर्जदारांचे संपूर्ण कागदपत्र तपासूनच विदेशी लायसन्स दिले जाते.
किरण मोरे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर
बॉक्स
किती जणांनी काढले इंटरनॅशनल लर्निंग लायसन्स
२०१६ - ३०
२०१७ - २०
२०१८ - २२
२०१९ - ३८
२०२० - ०६
२०२१- ०५