रस्त्यावर फेकलेल्या मास्कमुळे पशुधन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:37+5:302021-05-08T04:28:37+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या जिल्ह्यात १६ हजारांवर रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत ६७ हजारांवर नागरिक कोरोनाबाधित ...
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या जिल्ह्यात १६ हजारांवर रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आजपर्यंत ६७ हजारांवर नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या संक्रमितांची संख्या २३ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर डबल मास्क लावत आहेत. मात्र, स्वत:ला आजारापासून वाचविण्यासाठी मास्क वापरणारे इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता वापरलेले मास्क रस्त्यावर फेकत आहेत. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढला असून पशुधनही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरवासीयांकडून मास्कचा वापर जास्त होत आहे. मात्र, शहरातील काही ठिकाणी हे मास्क वापरून फेकून दिल्याचे चित्र आहे. वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावावी व सर्दी, खोकला व ताप असल्यास योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन सातत्याने केले जात आहे; परंतु या अशा पद्धतीने मास्क फेकले जात असतील तर अन्य नागरिकांसह पशुधनावरही विपरीत परिणाम पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
बाॅक्स
वापरलेले मास्क रस्त्यावर फेकू नये. यामुळे रस्त्यावर घाण होते. नागरिकांनी मास्कची योग्य विल्हेवाट लावावी. रोज कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. पालिकेद्वारा रोज सफाई होते; परंतु सफाईनंतरदेखील काही ठिकाणी कचरा टाकला जातो. या सर्व गोष्टी नागरिकांनी टाळाव्यात. विशेषत: मोकळे मैदान, भूखंडावर मोठ्या प्रमाणात वापरलेले मास्क टाकलेले दिसतात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सर्तक होणे सध्या तरी गरजेचे आहे.
कोट
कोरोना संक्रमण वाढल्यामुळे मास्क लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, काही नागरिक निष्काळजीपणे वापरलेले मास्क रस्त्यावर तसेच इतरत्र फेकत आहेत. त्यामुळे पशुधनालाही धोक्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्वत:सह पशुधनाच्या संरक्षणासाठी मास्क इतरत्र फेकू नये.
-देवेंद्र रापेल्ली,
अध्यक्ष, प्यार फाउंडेशन