कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:28 AM2021-05-18T04:28:57+5:302021-05-18T04:28:57+5:30
बॉक्स या लसी दिल्या जातात वेगवेगळ्या ऋतुमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात ...
बॉक्स
या लसी दिल्या जातात
वेगवेगळ्या ऋतुमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात घेऊन लसीकरण मोहीम राबवली जाते.
एफएमडी, घटसर्प, फऱ्या, लाळ्याखुरकत आदी लसीकरण करण्यात आले आहे. तर कोंबड्यांना लासोटा लसीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आवश्यक असणारे लसीकरणही लवकरच करण्यात येणार आहे.
बॉक्स
कोरोनाच्या सावटातही बजावले कर्तव्य
कोरोनाच्या काळात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश सोमनाथे यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेला खंड पडू न देता. स्वत:ची काळजी घेत लसीकरण मोहीम सुरुच ठेवली. लसीच्या होत असलेल्या पुरवठ्याप्रमाणे लसीकरण सुरुच आहे. पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.
कोट
पशुधनाचे लसीकरण सुरुच
कोरोना काळातही आमच्या विभागात अपुरे मनुष्यबळ असताना योग्य नियोजनाद्वारे गर्दीची ठिकाणे टाळून लसीकरण करण्यात येत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात १२ लाख ३२ हजार १८४ लस टोचण्यात आल्या आहेत. लसीकरणाची प्रक्रिया ही सतत सुरु आहे.
-अविनाश सोमनाथे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, चंद्रपूर
बॉक्स
जिल्ह्यातील जनावरांची एकूण आकडेवारी
गायवर्ग ३९५९१४
म्हैसवर्ग ६४०३८
मेंढी ५०४६५
शेळी २४०१८८
डुक्कर १४८३