चंद्रपुरातील लॉयड मेटल्सला अग्निशमन उपकरणांच्या अभावी अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:15 PM2017-12-28T15:15:57+5:302017-12-28T15:16:30+5:30

घुग्घुस एमआयडीसीतील लॉयड मेटल्स कारखान्यात अग्निशमन उपकरणे न बसविताच उत्पादन घेतले जात आहे. याबाबतमहाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाने लॉयड मेटल्सला नोटीस बजावून तातडीने अग्निशमन उपकरणे बसवावे, असा अल्टीमेटम दिला आहे.

Lloyd Metals in Chandrapur ultimatum for lack of fire fighting equipment | चंद्रपुरातील लॉयड मेटल्सला अग्निशमन उपकरणांच्या अभावी अल्टीमेटम

चंद्रपुरातील लॉयड मेटल्सला अग्निशमन उपकरणांच्या अभावी अल्टीमेटम

Next
ठळक मुद्देऔद्योगिक विकास महामंडळाने बजावली नोटीस

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : घुग्घुस एमआयडीसीतील लॉयड मेटल्स कारखान्यात अग्निशमन उपकरणे न बसविताच उत्पादन घेतले जात आहे. यामुळे तेथील कामगारांची सुरक्षा धोक्यात आहे. याबाबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महेश मेंढे यांनी महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार दाखल केल्यानंतर महामंडळाने लॉयड मेटल्सला नोटीस बजावून तातडीने अग्निशमन उपकरणे बसवावे, असा अल्टीमेटम दिला आहे.
लॉयड मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी प्रा. लि. नामक कारखाना मागील अनेक वर्षांपासून घुग्घुस एमआयडीसीमध्ये कार्यरत आहे. या कारखान्यात कोणत्याही प्रकारचे अग्निशमन उपकरणे न बसविता उत्पादन घेतले जात आहे. महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने या कारखान्याला २८ आॅगस्ट २०१२ रोजी तात्पुरते नाहरकत प्रमाणपत्र देऊन तत्काळ अग्निशमन उपकरणे बसवून अंतिम नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे सूचित केले होते.
मात्र लॉयड मेटल्सने या सूचनेची अंमलबजावणी केली नाही. दरम्यान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महेश मेंढे यांनी याबाबत महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार करून सदर कारखान्यात कामगारांची सुरक्षा धोक्यात असल्याचे त्यात नमूद केले आहे. याची दखल घेत महामंडळाने लॉयड मेटल्सला १५ डिसेंबरला नोटीस बजावली आहे. कारखान्यात तत्काळ अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बजावले आहे.

Web Title: Lloyd Metals in Chandrapur ultimatum for lack of fire fighting equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग