शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून लॉयडच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 07:19 PM2020-01-15T19:19:04+5:302020-01-15T19:19:13+5:30

मृतकाच्या परिवाराला 40 लाख नुकसान भरपाई व एक नोकरी

Lloyd's employee dies on the spot after shock of electric wire in the field | शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून लॉयडच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून लॉयडच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Next

चंद्रपूर : घुग्घुस येथील लॉयड मेटलचे सुरक्षा कर्मचारी रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना शेतातील वीज प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने सुरक्षा वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण किरकोळ जखमी झाला. गावकऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला जाब विचारल्याने तणाव निर्माण झाला होता. यावर प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना 40 लाख रुपये आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याने तणाव मिटला आहे. 


मृत सुरक्षा वाहन चालकाचे नाव सावन राजेश कुमरवार (वय 26) असे आहे. मंगळवारी रात्री दोन च्या दरम्यान  कारखान्याचे सुरक्षा इंचार्ज बंडू पवार व कैलाश व सतीश आणि  सुरक्षा रक्षका चे वाहन (जीप )ने कारखान्याच्या बाहेरील क्षेत्रातील जाकवेल पर्यत  रात्रकालीन गस्त करीत असताना एका ठिकाणी वाहन जास्त नसल्याने पायी जात होते. एका शेताच्या वीज प्रवाहित तारेला वाहन चालकाचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याला झटका लागून किरकोळ जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी सकाळी कारखान्याच्या मुख्य प्रवेशव्दारावर गर्दी केली. थोडावेळ तणाव निर्माण झाला.


  दरम्यान महा. प्र.कांग्रेस चे सरचिटणीस प्रकाश देवतळे, प.स.चे उप सभापती निरिक्षण तांद्रा, सरपंच संतोष नूने, कांग्रेस चे शहर अध्यक्ष राजुरेड्डी, माजी प.स. सभापती रोशन पचारे, पवन आगदारी, कामगार नेता सैयद अनवर, भाजप शहर अध्यक्ष विवेक बोढे, माजी तंटामुक्त अध्यक्ष हसन सिध्दीकी    , राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, कामगार सेना चे जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोबडे, बी आर एस पी विधान सभा उपाध्यक्ष सुरेश पाईकवार, ग्रा.प.सदस्य साजन गोहणे, ग्रा.प.सदस्य श्रीनिवास इसारफ, ईबादुल सिध्दीकी , सत्यनारायण डाखरे, मृतकाचे नातेवाईक व लायडचे मेहता ,प्रशांत पुरी यांच्यात ठाणेदार आमले यांच्या उपस्थित  मृतक परिवाराला नुकसान भरपाई मिळावी व एका ला नोकरी मिळावी या सदर्भात वाटाघाटी झाल्या त्यात मृतकाचे नातेवाईका ला 40 लाख रुपये नोकरी व अंत्यसंस्कारा साठी 50 हजार रुपये देण्याचे प्रबंधकाने मंजूर केल्या नंतर रोष शांत झाला.

Web Title: Lloyd's employee dies on the spot after shock of electric wire in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.