वरोरा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारास ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:28 AM2020-12-29T04:28:15+5:302020-12-29T04:28:15+5:30
वरोरा : चंद्रपूर - नागपूर मार्गावरील वरोरा शहरातील रत्नमाला चौक डॉ. एपीजे अब्दुल कलाम चौकामध्ये हॉयमास्ट लावण्यात यावा, ...
वरोरा : चंद्रपूर - नागपूर मार्गावरील वरोरा शहरातील रत्नमाला चौक डॉ. एपीजे अब्दुल कलाम चौकामध्ये हॉयमास्ट लावण्यात यावा, या मागणीसाठी भिम आर्मी एकता मिशन वरोराच्या वतीने न.प. मुख्य प्रवेशद्वारास सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कुलूप ठोकण्यात आले.
भिम आर्मी एकता मिशन वरोराच्या वतीने रत्नमाला चौक व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौकात हायमास्ट बसविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन काही दिवसांपूर्वी वरोरा न.प. ला देण्यात आले होते. रत्नमाला चौकामध्ये नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्री चौकामध्ये अंधुक प्रकाश असल्याने अनेक नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भिम आर्मी एकता मिशन वरोराचे तालुका अध्यक्ष शुभम गवई यांनी निवेदन दिले. त्या निवेदनाची दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ न.प. मुख्य प्रवेश द्वाराला सोमवारी कुलूप ठोकण्यात आले. घटनेच्या माहिती वरोरा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रवेशद्वारावरील कुलूप काढले. भिम आर्मी एकता मिशनचे वरोरा तालुका अध्यक्ष शुभम गवई व नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्यात चर्चा करण्यात आली. न. प. प्रवशासनाने हायमास्ट लावण्याकरिता सदर प्रकरण मंजुरीकरिता चंद्रप्ूर येथे पाठविण्यात आाले असून मंजुरी मिळाल्यानंतर हायमास्ट लावण्यात येईल. या प्रकरणी भिम आर्मी एकता मिशनचे तालुका अध्यक्ष शुभम गवईविरूद्ध वरोरा पोलिसांनी ३४१, १८६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.