लॉकडाऊनने मोबाइल दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:22+5:302021-06-06T04:21:22+5:30

कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी प्रशासनाने १३ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी ...

Lockdown hampered mobile repair | लॉकडाऊनने मोबाइल दुरुस्ती रखडली

लॉकडाऊनने मोबाइल दुरुस्ती रखडली

googlenewsNext

कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी प्रशासनाने १३ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी आबालवृद्धांपासून तर ज्येष्ठाचा मोबाइल हाच एकमेव आधार ठरत आहे. वर्क फॉर्म होम, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, नेट बॅंकिंग यासोबतच कोरोना रुग्णांची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच लसीकरण नोंदणीसाठी सर्वच जण मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत मोबाइलचा वापर आपसूकच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सततच्या वापराने व अन्य कारणांमुळे मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड दिसून येत आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे सकाळी ७ ते ११ यावेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यासोबतच ऑनलाइनने मोबाइलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद अवस्थेत आहेत. आता शासनाने निर्बंध शिथिल केल्याने मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी अनेकांची धावपळ राहणार आहे.

बॉक्स

मोबाइलमध्ये बिघाड झाल्याची कारणे

मोबाइल स्क्रीन गार्ड खराब झाले, सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड, आवाज न येणे किंवा जाणे, बॅटरी लवकर उतरणे, मोबाईल पडल्याने डिसप्ले फुटल्याच्या तक्रारी, पावसाळ्यापूर्वी मोबाइलला कव्हर लावणे, ॲटोमॅटिक इतरांना फोन लागणे, टच काम न करणे.

बॉक्स

दीड महिन्यांपासून बाजारपेठ बंद

कोरोनामुळे लॉकडाऊन हटविल्यानंतर काही प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्व बंद करण्यात आले. त्यामुळे दीड महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती करता आली नाही. परिणामी अनेकांचे मोबाइल बंद पडून आहेत.

बॉक्स

मोबाइल महत्त्वाचा पण आरोग्य

२१व्या शतकात मोबाइल हा आपला अविभाज्य अंग झाला आहे. परंतु, सततच्या वापराने अनेकांच्या मोबाइलमध्ये बिघाड झाला आहे. सोमवारपासून सर्वच दुकाने सकाळी ७ ते २ या वेळेत सुरू राहणार आहेत. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीसाठी गर्दी करू नये, अन्यथा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही. मोबाइल जरी महत्त्वाचा असला तरी आपले आयुष्य त्यापेक्षा किमती आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दीत्रूरु नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

-------

मागील वर्षभरापासूनच कोरोनाचे सकंट आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक ग्राहक मोबाइल दुरुस्तीसाठी फोन करतात. परंतु, सुटे सामान येत नसल्याने दुरुस्ती बंद आहे. आता सोमवारपासून दुकाने चालू होत असल्याचे ऐकून थोडा दिलासा मिळाला आहे.

-पंकज बाविस्कर, मोबाइल दुकानदार

Web Title: Lockdown hampered mobile repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.