गावकऱ्यांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:56 PM2018-07-31T22:56:26+5:302018-07-31T22:57:19+5:30

चिरोली येथील उध्दव शेंडे या युवकावर चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने त्याला मूल येथे नेताना वाटेतच मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ही घटना मंगळवारी घडली.

Locked by the villagers' health center | गावकऱ्यांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप

गावकऱ्यांनी ठोकले आरोग्य केंद्राला कुलूप

Next
ठळक मुद्देचिरोली येथील घटना : रुग्णांच्या मृत्यूने गावकरी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चिरोली येथील उध्दव शेंडे या युवकावर चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने त्याला मूल येथे नेताना वाटेतच मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ही घटना मंगळवारी घडली.
मूल तालुक्यातील चिरोली येथील उद्धव शेंडे यांना मागील काही दिवसांपासून अस्थमाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तो चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी ११ वाजता त्यांना जास्त त्रास जाणवत असल्याने ते प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले.
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिना आयलनवार यांनी रूग्णावर उपचार करून मूल येथे रेफर केले. परंतु, त्रास जास्त असल्याने व चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रूग्णाला आॅटोने मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नागरिक रुग्णालयात जाब विचारण्यासाठी गेले. मात्र रुग्णालयात डॉक्टर किंवा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी रुग्णालयाला कुलूप ठोकले.
डॉक्टरांचा मुख्यालयाला खो
चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रायपूरे यांच्याकडे प्रशासकीय व वित्त कामाचा प्रभार असून भगवानपूर येथील उपकेंद्राचाही अतिरिक्त प्रभार आहे. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. बिना आयलनवार, डॉ. कोमल मेश्राम, डॉ. देवगडे यांचीही याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र डॉ. कोमल मेश्राम यांना मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. उर्वरीत डॉक्टरही मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळे डॉक्टरांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी सरपंच कविता सुरमवार यांनी केली.

Web Title: Locked by the villagers' health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.