Lok Sabha Election 2019; १८ लाख ८४ हजारांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:13 PM2019-03-28T22:13:26+5:302019-03-28T22:14:07+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील दूध डेअरी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका दुचाकीतून १८ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रक्कम केली जप्त केली.

Lok Sabha Election 2019; 18 lakh 84 thousand cash seized | Lok Sabha Election 2019; १८ लाख ८४ हजारांची रोकड जप्त

Lok Sabha Election 2019; १८ लाख ८४ हजारांची रोकड जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील दूध डेअरी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका दुचाकीतून १८ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रक्कम केली जप्त केली.
सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना चंद्रपूर शहरातील दूध डेअरी मार्गावरील नियोजन भवन कार्यालयासमोर दुचाकीतून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने १८ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रक्कम केली जप्त केली आहे. शरद पुंडलिक रामटेके. रा. अंचलेश्वर वॉर्ड यांच्या जवळून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये २० हजारांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगण्यास बंदी असताना एक इसम दुचाकीमध्ये रोकड घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मोटेकर, अमोल गंधरे, रवींद्र पंधरे, जावेद सिद्दीकी, मनोज रामटेके, रवींद्र बोरकर यांनी सापळा रचला व संशयित दुचाकीची घडती घेतली असता दुचाकीत १८ लाख ८४ हजारांची बेहिशेबी रक्कम आढळून आली. याची माहिती तात्काळ निवडणूक आयोगातील संजय राईंचवार यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ भरारी पथकाला पाठवून ही रक्कम जप्त केली. त्यांना रकमेबद्दल विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रक्कम जप्त करण्यात आली. याबाबत आता अधिक चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; 18 lakh 84 thousand cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.