Lok Sabha Election 2019; काँग्रेसच्या मूलमधील रॅलीत अभिनेत्री आसावरी जोशींचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:39 PM2019-04-09T23:39:59+5:302019-04-09T23:42:38+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अनेक बेरोजगार युवक पदव्या घेऊन बसून आहेत. जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आले नाही. भाजप सरकारने देशाचे पार वाटोळे केले, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अनेक बेरोजगार युवक पदव्या घेऊन बसून आहेत. जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आले नाही. भाजप सरकारने देशाचे पार वाटोळे केले, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइंचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी मूल येथील बाजार चौकात जाहीर सभा झाली. यावेळी आमदार वडेट्टीवार बोलत ते होते. तत्पूर्वी सिनेअभिनेत्री आसावरी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मूल येथील गांधी चौकातून रॅली निघाली. रॅली गुजरी चौकात दाखल होताच रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
या प्रचार सभेला सिनेअभिनेत्री आसावरी जोशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, बाजार समितीचे सभापती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, माजी सभापती राकेश रत्नावार, मूल पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील मारकवार, प्रकाशपाटील गांगरेड्डीवार, वैशालीताई पुल्लावार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, गोंडवाना गणतंत्र पाटीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रास्ताविक राष्ट्रवादी काँंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मंगेश पोटवार यांनी केले. सभेला विजय वडेट्टीवार यांनी मतदारांना संबोधित करीत असताना पावसाच्या सरी कोसळल्या. यानंतर १ तास गारासह पाऊस पडला. यामुळे काँग्रेसचे उमेदवार धानोरकर व सिनेअभिनेत्री जोशी यांना मतदारांना संबोधित करताना अडचणी आल्या.
नरेश पुगलियांच्या भेटीला धानोरकर
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धानोरकर यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुकासाठी पुगलिया यांचे आशीर्वाद मागितल्याची माहिती आहे. गेल्या बारा दिवसांपासून प्रचार सुरू होता. दरम्यान, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भेट घेतल्याची चर्चा शहरात होती.