Lok Sabha Election 2019; चंद्रपुरात अहिरांची लढत माजी शिवसैनिकाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:10 AM2019-03-30T10:10:53+5:302019-03-30T10:15:48+5:30

पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.

Lok Sabha Election 2019; Ahir's fight against former Shiv Sena in Chandrapur | Lok Sabha Election 2019; चंद्रपुरात अहिरांची लढत माजी शिवसैनिकाशी

Lok Sabha Election 2019; चंद्रपुरात अहिरांची लढत माजी शिवसैनिकाशी

Next
ठळक मुद्देबंडखोरीमुळे वाढली रंगत वंचित बहुजन आघाडीमुळे मते विभाजनाची शक्यताप्रमुख उमेदवार: हंसराज अहीर, सुरेश धानोरकर, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे

राजेश भोजेकर 

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने दोनदा उमेदवार बदलल्याने देशपातळीवर चर्चेत आला. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा हात धरलेल्या सुरेश धानोरकर यांना अखेरच्याक्षणी तिकीट दिल्याने निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.
विजयाची हॅट्ट्रीक साधणारे हंसराज अहीर यांच्यावर पुन्हा एकदा भाजपाने बाजी लावली आहे. त्यांच्यासह १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, बसपासह बसपातून बाहेर पडलेला एक गट बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी)च्या रुपाने रिंगणात आहे. या मतदार संघाचा गेल्या १९९९ पासूनचा इतिहास बघता ८० हजार ते २ लाखांपर्यंत मते घेणारा तिसरा दमदार चेहरा या निवडणुकीत दिसत नाही. या मतांवर युती आणि आघाडीसह अन्य पक्षांचा डोळा आहे.
२०१४ मध्ये देशात मोदी लाट होती. त्यावेळी भाजप उमेदवाराने तब्बल ५ लाखांवर मते घेतली. ती लाट आता दिसत नाहीे. युतीपुढे ही मते टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. काँग्रेसने शिवसेनेच्या नेत्याला निवडणुकीत उतरविल्यामुळे पक्षातील एक गट कमालीचा नाराज आहे. या गटाच्या हालचाली काँग्रेसची डोकेदुखी दिसत असले तरीही रिंगणातील सर्व उमेदवारांवर लक्ष टाकल्यास युती व आघाडीत दुहेरी लढतीचे चित्र दिसत आहे. २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ च्या निवडणुकीत ही स्थिती होती.
वंचित बहुजन आघाडी, बीआरएसपी व बसपा या पक्षांमुळे काहीअंशी मतांचे विभाजन होईल असे चित्र आहे. आप व शेतकरी संघटना बीआरएसपीसोबत असली तरी फार चमत्कार करेल असे वातावरण नाही. गेल्या चार निवडणुका लक्षात घेता या पक्षात चौथ्या क्रमांकासाठी लढाई होईल असे दिसते.
उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होताच रणधुमाळीने वेग धरला आहे. उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. मात्र, धानोरकरांना उमेदवारी मिळाल्याने गटबाजी थांबली आहे. दुसरीकडे धानोरकर हे शिवसेनेचे माजी आमदार असल्याने असंख्य शिवसैनिक त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे एकाअर्थी ही निवडणूक अहीर विरुद्ध धानोरकर अशी नसून भाजप विरुद्ध शिवसेना अशीच आहे.

पाच वर्षांत मतदार संघाचा भक्कम विकास झाला. सात हजार लोकांना रोजगार मिळवून दिला. नितीन गडकरी यांनी दिलेल्या केंद्रीय रस्ते विकास निधीतून चार हजार कोटींची कामे सुरू आहे. अनेक रेल्वे थांबे झाले. पीट लाईन, तिसरी रेल्वे लाईनसह व राष्ट्रीय दर्जाचे सॅटेलाईट सेेंटर सुरू होईल. ही मोठी उपलब्धी आहे.
- हंसराज अहीर, भाजपा

युतीच्या खासदाराने सापत्न वागणूक दिली. आपण अस्वस्थ होतो. युती सरकार असूनही आंदोलने करावी लागली. लोकसेवा करायची आहे. २० वर्षांपासून या भागाचा विकास नाही. निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. युतीतून हे
शक्य नव्हते. जनभावना लक्षात घेऊन काँगेसने अखेरच्याक्षणी तिकीट दिली.
- सुरेश धानोरकर, काँग्रेस

कळीचे मुद्दे
शेतमालाला योग्य बाजारभाव, जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के बंद पडलेले उद्योग, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न विरोधक उचलून धरतील.
पीट लाईनसह रेल्वे प्रवाशांचे सोडविलेले प्रश्न, ग्रामीण व शहरी भागात झालेला विकास व केंद्राच्या योजना सत्ताधारी सांगतील.

Web Title: Lok Sabha Election 2019; Ahir's fight against former Shiv Sena in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.