Lok Sabha Election 2019; काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होऊच शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:11 PM2019-04-02T22:11:06+5:302019-04-02T22:11:51+5:30

भाजपा सरकार हे गरीबांचे सरकार असून विरोधी असणारे ५६ पक्ष एकत्र येवून भाजपाला माघारी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होवून शकत नाही. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांसाठी येणारी मदत त्यांना मिळत नव्हती. ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नव्हती, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे जिवती तालुक्यातील शेणगाव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली.

Lok Sabha Election 2019; Congress can not be ruled by farmers | Lok Sabha Election 2019; काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होऊच शकत नाही

Lok Sabha Election 2019; काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होऊच शकत नाही

Next
ठळक मुद्देरावसाहेब दानवे : भाजपच्या प्रचारार्थ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती(चंद्रपूर) : भाजपा सरकार हे गरीबांचे सरकार असून विरोधी असणारे ५६ पक्ष एकत्र येवून भाजपाला माघारी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांचे सरकार होवून शकत नाही. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांसाठी येणारी मदत त्यांना मिळत नव्हती. ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नव्हती, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे जिवती तालुक्यातील शेणगाव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली.
भाजपा राजवटीत शेवटच्या घटकापर्यंत पूर्णत: मदत पोहचत आहे. जिवती मधील वनजमिनीच्या पट्ट्याच्या विषयावर हे सरकार सकारात्मक आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिवती येथे बैठक लावून प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही दानवे यांनी यावेळी नागरिकांना आश्वस्त केले. मंचावर युतीचे उमेदवार हंसराज अहीर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, शिवसेना उपपमुख पंढरी मस्कले, जि.प. सभापती गोदावरी केंद्रे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाघूजी गेडाम, तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, पं.स. सभापती सुनील मडावी, उपसभापती महेश देवकते, नगराध्यक्षा पुष्पा नैताम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, शिवाजी सेलोकर, जि.प. सदस्य कमला राठोड, सतीश धोटे, अरुण मडावी, माणिक उपलेंचवार, दत्ता राठोड उपस्थिते होते.शेतकºयांच्या प्रकल्पबाधित होणाऱ्या जमिनींना वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी लोकसभेत विधायक लढा देवून अनेक उद्योगात अल्प दरात अधिग्रहीत होणाऱ्या जमिनींना खासदार हंसराज अहीर यांनी न्याय मिळवून देत मोठ्या प्रमाणात वाढीव मोबदला मिळवून दिला आहे. त्यांचे हे कार्य लोकसभेत अगदी जवळू बघत आलो आहे. जिवतीसारख्या अतिदुर्गम भागाचा विकास साधायचा अहीर यांना पुन्हा संधी द्यावी, असेही दानवे म्हणाले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Congress can not be ruled by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.